(जाकादेवी / वार्ताहर)
आगरनरळ ग्रामविकास मंडळ या शैक्षणिक,समाजिक संस्थेच्या अध्यक्षपदी श्री.राजेंद्र महाकाळ तर उपाध्यक्षपदी श्री.अशोक लवंदे यांची निवड करण्यात आली आहे. या मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा श्री.वामन बेंडू लवंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या सभेमध्ये संस्थेच्या सन – जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२८ या कालावधीसाठी कार्यकारिणीची निवड सर्वानुमते करण्यात आली.
शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी श्री.राजेंद्र पांडुरंग महाकाळ- उपाध्यक्ष -श्री.अशोक दत्तात्रय लवंदे – सेक्रेटरी श्री. शांताराम बाळ भालेकर- सहसचिव श्री.सदानंद गजानन महाकाळ-कोषाध्यक्ष- श्री.अनिल हरिश्चंद्र लवंदे – तर संचालक पदी श्री.पर्शुराम पांडुरंग महाकाळ- श्री.विजय पांडुरंग महाकाळ- श्रीम.जान्हवी दिलीप महाकाळ श्री.प्रभाकर गणपत महाकाळ- श्री.राकेश शांताराम मिंडे श्री.सचिन हरिश्चंद्र पडवळ इ. संचालक मंडळात निवड करण्यात आली आहे.
सदर संस्था गेली ४३ वर्ष आगरनरळ सारख्या ग्रामीण भागामध्ये एक सामाजिक, शैक्षणिक काम करत आहे. संस्थेने सन १९९२ साली ज्ञान मंदिर विद्यालय आगरनरळ या शाळेची स्थापना करून ग्रामीण भागातील मुलांसाठी १० वी पर्यंतचे शिक्षणाचे दरवाजे उभे केले. गरीब, कष्टाळू मुलांचे शिक्षण ७ वी पर्यंत थांबत होते. या शाळेमुळे काही विद्यार्थी मालगुंड, जाकादेवी, खंडाळा या सारख्या ठिकाणी पायी प्रवास करून आपले शिक्षण पूर्ण करत होते. त्यांची परवड थांबली.
आज संस्थेच्या या शाळेच्या निकालाचा आलेख संस्थेच्या मार्गदर्शनाने व शिक्षकांच्या अथक प्रयत्नामुळे कायम स्वरूपी चढता आहे. अन्य क्षेत्रातही प्रशालेची कामगिरी उल्लेखनीय होत आहे.
प्रशालेत आगरनरळ, कोळीसरे, गडनरळ, कळझोंडी या परिसरातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी एक उदात्त हेतू ठेवून सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांची परवड थांबविण्यासाठी स्वतः आर्थिक झळ सोसून विनानुदानित तत्वावर सुरु केलेली ही शाळा आज १००% अनुदावर कार्य करून ग्रामीण भागातील मुलांसाठी एक वरदान ठरत आहे.

