( रत्नागिरी / प्रतिनिधी )
बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा रत्नागिरीची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून रत्नागिरी तालुका अध्यक्षपदी कळझोंडी गावातील सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील अग्रगण्य आणि दानशूर व्यक्तिमत्त्व प्रकाश रामचंद्र पवार यांची तिसऱ्यांदा तालुकाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली असून सचिव पदावर सुहास कांबळे यांचीही फेरनिवड करण्यात आली आहे.
या कार्यकारिणीने गेली अनेक वर्षे तालुक्याचे कुशल नेतृत्व करून आपला कारभार पारदर्शक ठेवला. सामाजिक व धार्मिक क्षेत्राला गती दिली.सामाजिक व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय व प्रशंसनीय उपक्रम राबविले. तालुका कमिटीने सामाजिक व धार्मिक उत्सव यशस्वीपणे राबविण्यासाठी राज्य कमिटीशी चांगला समन्वय ठेवला. त्यामुळे तालुक्यातील सर्व शाखांनी अनेक वर्षे कार्यरत असलेल्या पदाधिकारी यांना पुन्हा काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
सदर निवडणुकीत खालील प्रमाणे कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी प्रकाश रामचंद्र पवार, उपाध्यक्ष – विजय सुडकाजी आयरे, चिटणीस – सुहास विनायक कांबळे, उप चिटणीस शशिकांत, सदाशिव कांबळे, खजिनदार मंगेश विठ्ठल सावंत या पदाधिकाऱ्यांची निवड सर्व गावशाखांनी बिनविरोध करण्याची भूमिका ठेऊन निवडणूक उत्साहात संपन्न झाली. सदर निवडणुक प्रक्रिया घेण्यासाठी बौद्धजन पंचायत समिती मध्यवर्ती समिती मुंबईच्या निवडणुक समितीचे अध्यक्ष मिलिंद जाधव यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तर निवडणूक समितीचे चिटणीस विजय जाधव यांनी सहाय्यक निवडणुक अधिकारी म्हणून उत्तम प्रकारे कामकाज पाहिले.
नव्याने निवड झालेल्या कार्यकारिणीचे तालुक्यातील गाव शाखांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.यावेळी विविध गाव शाखांचे पदाधिकारी, मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.आजपर्यंत केलेल्या कामाची पोचपावती तालुक्यातील शाखांनी देऊन आमच्या कार्यकारिणीवर विश्वास दाखविला,हा विश्वास आमची तालुका कमिटी सार्थ ठरवेल, असा आत्मविश्वास फेरनिवड झालेले धडाडीचे व उपक्रमशील अध्यक्ष प्रकाश पवार यांनी व्यक्त केला आहे.