( रत्नागिरी )
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत, रत्नागिरी शिरगांव येथील मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाचे तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे फिशिंग बोट कन्स्ट्रक्शन अँड मरीन इंजिन या विषयांतर्गत फायबरग्लास मासेमारी नौका बांधणी तंत्रज्ञानाच्या सखोल अभ्यासासाठी विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. संजय भावे सर, शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे सर, आणि सहयोगी अधिष्ठाता, कृषी तंत्रज्ञान शिक्षण डॉ. ठोकळ सर यांची परवानगी आणि मार्गदर्शनाखाली कार्यानुभव कालावधीमध्ये नाईक कं. कोस्टल मरिन पिपल एफ. आर. पी. बोट बिल्डिंग, भगवती बंदर रत्नागिरी येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणा अंतर्गत सहभागी विद्यार्थी, विविध प्रकारचे फायबर मासेमारी नौकांचे फायबर साचे तयार करणे व साच्यापासून नौका तयार करून त्यावर डेक, केबिन तयार करणे तसेच डेकवरती विविध प्रकारची मासेमारी साधने बसविणे आणि इंजिन व त्यांची उपकरणे बसवून नौका कार्यान्वित करणे याचा प्रत्यक्ष व्यावहारिक अनुभव घेत आहेत. श्री. विष्णू नाईक, श्री. नवीन नाईक, श्री. सचिन नाईक, श्री. लक्ष्मीकांत नाईक, विक्रांत कुळदणकर, श्री. संतोष प्रभुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फायबर मासेमारी नौका बांधणी कशी केली जाते याचे ज्ञान अर्जित करत आहेत.
या प्रशिक्षणामध्ये तीन विद्यार्थि पौरस घडी, प्रथम गोलटकर, ओजस भरणकर या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून प्रशिक्षणाचे आयोजन सहाय्यक प्राध्यापक निलेश मिरजकर, यांनी मत्स्य अभियांत्रिकी पदविका संस्थेचे प्राचार्य / सहयोगी अधिष्ठाता, डॉ. आशिष मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे.