(जैतापूर / वार्ताहर)
नाटे विभागीय पोलीस पाटील संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज साखरी नाटे ग्रामपंचायत सभागृह, नाटे येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. संघटनेचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने या सभेत नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. संघटनेत नव्या व युवा सदस्यांना संधी देण्याच्या उद्देशाने पुढील कार्यकाळ तीन वर्षांचा ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी सर्वानुमते घेण्यात आला.
या सभेत अध्यक्षपदी मिठगवाणे येथील पोलीस पाटील श्री. गजानन गोपाळ भोगले यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून साखर येथील पोलीस पाटील श्री. रोहीदास गोविंद कांबळी यांची, तर सचिवपदी कार्शींगे येथील पोलीस पाटील श्री. राजू सिताराम कार्शिकर यांची नियुक्ती करण्यात आली. सहसचिवपदी सौ. रंजीता रोशन लाड, खजिनदारपदी नावेदर येथील पोलीस पाटील श्री. आतिष पांडूरंग भोवड यांची निवड झाली. हिशोब तपासणीसाठी सौ. निधी विकास बांधकर यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली.
कार्यकारिणी सदस्य म्हणून श्री. महेश विलास हळदणकर, श्री. शिवप्रसाद सुरेश दसुरी, श्री. मिरंजन विकास लिंगायत, सौ. गीत गणेश पावसकर, सौ. सान्वी सचिन सोडये, श्री. फैजान जिक्रिया वाडकर, श्री. नितीन जयवंत कदम आणि सौ. सोनाली मनिष नार्वेकर यांची निवड करण्यात आली. तसेच संघटनेच्या मार्गदर्शनासाठी सल्लागार म्हणून श्री. प्रमोद पुरुषोत्तम सुतार व श्री. राजन पशुराम शिर्सेकर यांची नियुक्ती करण्यात आली असून कायदेतज्ञ म्हणून श्री. प्रमोद कृष्णा वारिक यांची निवड करण्यात आली आहे.
सागरी पोलीस ठाणे, नाटे अंतर्गत येणाऱ्या गावांतील पोलीस पाटलांची ही संघटना असून, कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करणे, प्रशासनाशी समन्वय वाढवणे तसेच पोलीस पाटलांच्या विविध समस्या व अडचणी शासनदरबारी प्रभावीपणे मांडणे या दिशेने नवनिर्वाचित कार्यकारिणी सक्रियपणे कार्य करणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

