(गुहागर)
गुहागर नगरपंचायतीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित भाजपा नगराध्यक्षा व नगरसेवकांनी भाजपा उत्तर जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्या समवेत मुंबईतील रायगड बंगल्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी सहकारी अनिकेत पटवर्धन उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्षांचे आभार मानत आशीर्वाद घेतले.
प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी गुहागर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. जनतेच्या अपेक्षा लक्षात घेऊन प्रामाणिकपणे जनसेवक म्हणून काम करण्याचा सल्ला त्यांनी नगराध्यक्षा व नगरसेवकांना दिला.
गुहागर नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीने वर्चस्व मिळवले असून, विशेष बाब म्हणजे भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला आहे. या यशासाठी भाजपचे माजी आमदार डॉ. विनय नातू, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, निलेश सुर्वे यांच्यासह पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.
या भेटीप्रसंगी नगराध्यक्षा सौ. निता मालप, नगरसेवक उमेश भोसले, नगरसेविका सौ. वैशाली मावळणकर, अनुषा भावे, सुषमा रहाटे, मिरा घाडे, विषाखा सोमण तसेच भाजपाकडून शिवसेनेला दिलेले उमेदवार सौ. स्वरा तेलगडे, संदेश उदेक उपस्थित होते. याशिवाय रत्नागिरी जिल्हा निवडणूक संयोजक दीपक पटवर्धन, रेल्वे समिती सदस्य सचिन वहाळकर, जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, अक्षय फाटक, पदवीधर पदाधिकारी अशोक दळवी, शिक्षक संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अमोल भोबस्कर, गुहागर तालुकाध्यक्ष अभय भाटकर, तालुका सरचिटणीस संतोष सांगले, शहराध्यक्ष नरेश पवार आणि युवा मोर्चा शहराध्यक्ष मुन्ना पालशेतकर यांची उपस्थिती होती.

