(गुहागर / सचिन कुळये)
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा, तवसाळ–तांबडवाडीने गुहागर पडवे उर्दू केंद्रीय हिवाळी क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल पाच बक्षिसांवर आपले नाव कोरले आहे.
दिनांक १६ व १७ डिसेंबर २०२५ रोजी मौजे कुडली येथील आदर्श शाळा क्रमांक १ येथे या केंद्रीय क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. दरवर्षीप्रमाणे यंदाही तवसाळ–तांबडवाडी आदर्श शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकारात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
सांघिक क्रीडा प्रकारातील यश
1. लहान गट खो-खो – विजेता
2. लहान गट कबड्डी – उपविजेता
3. लहान गट लंगडी – उपविजेता
4. मोठा गट लंगडी – उपविजेता
5. मोठा गट कबड्डी – उपविजेता
वैयक्तिक क्रीडा प्रकारातील यश
- उंच उडी (मोठा गट, मुले): हर्ष दिपक निवाते – द्वितीय क्रमांक
- लांब उडी (मोठा गट, मुले): हर्ष दिपक निवाते – द्वितीय क्रमांक
- उंच उडी (लहान गट, मुले): रुद्र मंगेश पारदळे – द्वितीय क्रमांक
- लांब उडी (लहान गट, मुले): रुद्र मंगेश पारदळे – तृतीय क्रमांक
- १०० मीटर धावणे (मोठा गट, मुली): सिद्धी दिपक येद्रे – तृतीय क्रमांक

क्रिकेट स्पर्धेत जल्लोष
क्रिकेट स्पर्धेत हर्ष दिपक निवाते याने अवघ्या ३ चेंडूंमध्ये ३ षटकार ठोकत वैयक्तिक २० धावा केल्या आणि तवसाळ संघाला विजय मिळवून दिला. त्याच्या या स्फोटक खेळीमुळे मैदानावर एकच जल्लोष पाहायला मिळाला. बालवयातच चमक दाखवणाऱ्या हर्षला “तवसाळ–तांबडवाडीचा उगवता सितारा” म्हणून गौरवण्यात आले.
सत्कार व गौरव
विजेता व उपविजेता ठरलेल्या शाळांना चषक व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. या यशाचे श्रेय मुख्याध्यापक श्री. अंकुर मोहिते, श्री. संदीप भोये, कु. साई पुजारा तसेच पालक, ग्रामस्थ व महिला मंडळ यांना देण्यात आले.
‘मिशन लोकशाही’ प्रकल्पातही उज्ज्वल कामगिरी
पंचायत समिती गुहागरच्या ‘मिशन लोकशाही’ उपक्रमांतर्गत तालुकास्तरीय परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा केंद्रस्तरीय सत्कार करण्यात आला. या प्रकल्पात जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळेचे सर्वाधिक विद्यार्थी पात्र ठरले.
- इयत्ता ७ वी: सृष्टी संतोष येद्रे – केंद्रातून प्रथम क्रमांक
- इयत्ता ६ वी: आदिती रमेश कुरटे – केंद्रातून प्रथम क्रमांक
- इयत्ता ६ वी: दर्शित अशोक निवाते – केंद्रातून द्वितीय क्रमांक
- इयत्ता ४ थी: आदित्य नरेश निवाते – केंद्रातून प्रथम क्रमांक व तालुक्यातून दहावे स्थान
सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार पडवे केंद्रप्रमुख श्री. मुजावर यांच्या हस्ते करण्यात आला.
दोन दिवस चाललेल्या या केंद्रीय क्रीडा स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी उपस्थित पालक, शिक्षकवृंद, ग्रामस्थ, महिला मंडळ व क्रीडारसिकांचे आभार मानण्यात आले. तसेच सर्व खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

