(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे बीट मधील शालेय हिवाळी क्रीडा स्पर्धेमध्ये निवेंडी केंद्राने सांघिक व वैयक्तिक स्पर्धेमध्ये सर्वाधिक गुण मिळवून जनरल चॅम्पियनशिप पटकावली आहे.
गणपतीपुळे बीट स्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंडी या प्रशालेच्या भव्य मैदानावर पार पडल्या .या स्पर्धेत सांघिक खेळामध्ये मोठा गट कबड्डी निवेंडी- विजेता तर जांभारी उपविजेता, मुलगे खो-खो निवेंडी-विजेता, जांभारी- उपविजेता, मुली कबड्डी निवेंडी- विजेता ,जांभारी -उपविजेता, खो-खो मुली- निवेंडी -विजेता, जांभारी -उपविजेता, लंगडी मुली निवेंडी -विजेता ,जांभारी- उपविजेता ,त्याचबरोबर (लहान गट )सांघिक स्पर्धा मुलगे- निवेंडी -विजेता, जांभारी- उपविजेता ,खो-खो मुलगे -वाटद विजेता ,निवेडी -उपविजेता, मुलीं कबड्डी- निवेंडी – विजेता, संदखोल -उपविजेता, खो-खो मुली- वाटद- विजेता, कळझोंडी
उपविजेता ,लंगडी मुली वाटद-विजेता ,जांभारी- उपविजेता,
वैयक्तिक क्रीडा स्पर्धेतील विजयी स्पर्धक पुढील प्रमाणे (मोठागट) धावणे-मुलगे- वृषभ नामदेव भुते- निवेंडी खालची -(प्रथम,) अर्णव मनोज पायरे -निवेंडी खालची -(द्वितीय )श्री अमित शिगवण -वाटद मिरवणे -(तृतीय) लांब उडी- शौर्य राजेंद्र सुर्वे- वाटदमिरवणे (प्रथम) चिन्मय मंगेश लोगडे -निवेडी खालची- (द्वितीय )आदित्य दिलीप वीर कळझोंडी नंबर २. (तृतीय )उंच उडी इशांत कन्हैया धोपावकर जांभारी (प्रथम) रुद्र रोहिदास गोरे निवेंडी खालची (द्वितीय) संभव मंगेश येलये -जांभारी(तृतीय )थाळीफेक अथर्व विनायक भुते -भंडारपुळे (प्रथम) आदित्य दिलीप वीर कळझोंडी नंबर दोन (द्वितीय) ओम अमोल भुते -निवेंडी खालची -(तृतीय) बुद्धिबळ-दुर्वेश योगेश रामाणे भंडारपुळे (प्रथम )श्रीराम जयंत रहाटे -वाटदमिरवणे -(द्वितीय,) गोळा फेक -वृषभ नामदेव भुते – निवेडी खालची( प्रथम )श्रीराम जयंत रहाटे -वाटद मिरवणे- (द्वितीय) अर्णव मनोज पायरे (तृतीय)
मुली मोठागट धावणे- आर्या मोहन शिकवण- निवेडी वरची- (प्रथम) सुरक्षा देवचंद पावरी -जांभारी -(द्वितीय )तिर्था राकेश भुते -निवेंडी खालची- (तृतीय) लांब उडी प्रिया बलराम चौधरी -कळझोंडी नंबर दोन( प्रथम )तिर्था राकेश भुते -निवेंडी खालची -(द्वितीय) कार्तिकी योगेश सुर्वे- चाफेरी नं.१( तृतीय )उंच उडी -वैद्यही महेंद्र शितप -निवेडी वरची -(प्रथम )तिर्था राकेश भुते -निवेंडी खालची (द्वितीय) अनामिका विनोद अवेरे -जांभारी मराठी (तृतीय )थाळीफेक -आर्या मोहन शिगवण- निवेंडी वरची -(प्रथम )खदीजा परवेज होडेकर -जयगड उर्दू -(द्वितीय) अनन्या सुशांत पटेकर -जांभारी मराठी -(तृतीय )बुद्धिबळ -हर्षा नितीन सुर्वे -भंडारपुळे -(प्रथम) काव्या मनोहर आंबेरकर -जांभारी -(द्वितीय)
लहान गट मुलगे वैयक्तिक स्पर्धा धावणे -इब्राहिम मजहर टेमकर- जयगड उर्दू( प्रथम) राज वैभव नमसले -निवेंडी खालची -(द्वितीय )अभी अजित दुर्गवळी- मालगुंड दुर्गवळीवाडी -(तृतीय) लांब उडी – स्वराज महेश तांबटकर वाटद कवठेवाडी – (प्रथम )अथर्व रामचंद्र निंबरे कळझोंडी नंबर दोन (द्वितीय) आराध्य गुरुदास लाकडे जांभारी मराठी (तृतीय )उंच उडी- आराध्य गुरुदास लाकडे -जांभारी (प्रथम )संघर्ष नंदकुमार हेदवकर वरवडे खारवीवाडा( द्वितीय) इब्राहिम मजहर टेमकर जयगड उर्दू -(तृतीय )थाळीफेक -वेदांत विलास पिंपले -चाफेरी नंबर १ (प्रथम )अथर्व रामचंद्र निंबरे कळझोंडी नंबर दोन( द्वितीय) धीरज नारायण बळकटे -जांभारी मराठी -(तृतीय )
बुध्दिबळ -विहान राकेश पवार सांडेलावगण (प्रथम )ओम विजय बाचीम- भंडारपळे (द्वितीय),
गोळा फेक धीरज नारायण बळकटे -जांभारी मराठी -(प्रथम) समर्थ सुहास मेस्त्री -वाटद धोपटवाडी -(द्वितीय) यश अशोक वीर काळझोंडी नंबर दोन (तृतीय ) वैयक्तिक क्रीडा स्पर्धा (लहान गट) मुली धावणे -निष्कर्षा विनोद वरवटकर -वाटद रायवाडी (प्रथम )दुर्वा मारुती कुर्टे -वाटद कवठेवाडी -(द्वितीय )कौशल्या रवींद्र पावरी जांभारी मराठी (तृतीय )लांब उडी -मुली -रुही रामचंद्र बैकर सत्कोंडी -(प्रथम) मुग्धा संतोष थुळ -सत्कोंडी-( द्वितीय) आराध्या रवींद्र निंबरे कळझोंडी नंबर दोन (तृतीय )उंच उडी -परिधी मोहन शिगवण -निवेडी (प्रथम) आसावरी दीपक बारगुडे- वाटद- (द्वितीय) आराध्या रवींद्र निंबरे कळझोंडी नंबर दोन (तृतीय) थाळीफेक -श्रुतिका सुभाष पडवळ- भंडारपुळे (प्रथम) आरोही मनोज सुर्वे -चाफेरी नंबर एक (द्वितीय) दुर्वा युवराज पाटील -नांदिवडे नंबर एक -(तृतीय) बुद्धिबळ -श्रुतिका सुभाष पडवळ -भंडारपुळे -(प्रथम )मिताली महेश माने वाटद कवठेवाडी -(द्वितीय)
या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ गणपतीपुळे बीट विस्तार अधिकारी सविता तोटावार यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली तर रीळ उंडी गावचे उद्योजक शिक्षण प्रेमी नागरिक – सरपंच राकेश महाडीक,अण्णा काणे, कळझोंडीचे उपसरपंच प्रकाश पवार,वाटद केंद्र प्रमुख संतोष मोहिते, निवेंडी केंद्र प्रमुख प्रितम साळवी, जांभारी केंद्र प्रमुख -प्रज्ञा वाघोदे, संदखोल केंद्र प्रमुख -अरविंद महाकाळ, व्यवस्थापक व कळझोंडी केंद्र प्रमुख -जयदीप यादव,उंडी शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक संदीप डांगे, ग्राम पंचायत समितीचे उपसरपंच, सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती,शिक्षक, पालक, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, उंडी ग्रामस्थ मंडळ, युवक, अंगणवाडी कर्मचारी, पोषक आहार व्यवस्थापक महिला,सर्व शिक्षक, विद्यार्थी यांच्या उपस्थितीत अतिशय मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुत्रसंचलन व आभार उंडी शाळेचे मुख्याध्यापक संदीप डांगे यांनी अतिशय उत्तम प्रकारे मानले.शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावार यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षतेखाली सर्व केंद्र प्रमुख, स्पर्धेचे पंच, सरपंच यांनी आपली जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडली.

