(पाली / वार्ताहर)
राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री व जिल्ह्य़ाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त पालीमध्ये रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोशिएशनच्या मान्यतेने जिल्हास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा महिला व पुरुष गटामध्ये
दि.२३,२४,२५ डिसेंबर २०२५ रोजी संपन्न होणार आहेत.
स्पर्धेतील विजेत्या पुरुष गट संघाला प्रथम पारितोषिक रुपये २१,१११/- व चषक, द्वितीय पारितोषिक रुपये १५,५५५/- व चषक असे असून विजेत्या महिला गटाला प्रथम पारितोषिक रोख रक्कम व चषक, द्वितीय पारितोषिक रोख रक्कम व चषक असे देण्यात येणार आहे. या स्पर्धांचे आयोजन पाली युवा मंच, शिवसेना शाखा पाली पाथरट व युवा सेना यांनी केले आहे.
स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी अतुल सावंत ९४०४१६०३३४, स्वप्नील घडशी ७३८७७३९५६४, ऋषिकेश साळुंखे ८०८०३८६०९२ यांच्याशी संपर्क साधावयाचा आहे. या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा डी.जे. सामंत महाविद्यालय पालीच्या मैदानावर होणार आहेत.

