(गुहागर)
गुहागर तालुक्यातील मासू गावचे सुपुत्र आणि शांताराम चारिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष, समाजसेवक श्री. राजेश मासवकर यांना ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सद्भावना समजभूषण पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला आहे.
हा सन्मान रविवार, दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबई येथील पत्रकार भवन येथे मैत्री संस्था आणि युवा सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात देण्यात आला.
हा पुरस्कार महाराष्ट्र पोलीस दलाचे माजी महासंचालक श्री. सुधाकर सुराडकर आणि रायगड जिल्ह्याचे कामगार नेते श्री. महेंद्र घरत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गुहागर तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात सतत कार्यरत राहून समाजहितासाठी योगदान देणाऱ्या राजेश मासवकर यांच्या या सन्मानाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या पुरस्काराबद्दल स्व. तानाजी डाफळे प्रतिष्ठानचे संस्थापक/अध्यक्ष श्री. मनोज तानाजी डाफळे यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

