(देवरुख)
शहरातील सोन्याचे व्यापारी धनंजय केतकर अपहरण प्रकरणातील सहा आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीशांनी या सहा आरोपींना ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, त्यामुळे ही कोठडी आता १० ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे.
आरोपींनी आपल्या साथीदारांची नावे पोलिसांना दिली आहेत, मात्र हे साथीदार अद्याप पसार आहेत. पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

