(रत्नागिरी / वार्ताहर)
गुरव ज्ञाती समाज मुंबई (ऐ १६१४) या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला वधू–वर सूचक मेळावा रविवार, दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी कांचन हायस्कूल, नालासोपारा (पूर्व) येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यास समाजातील मुले–मुली तसेच त्यांच्या पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. दीपप्रज्वलन संस्थेचे प्रमुख कार्यवाह श्री. गणपत लाड, विश्वस्त सौ. सुजाता पवार आणि सहसचिव श्री. विलास गुरव (डोंगरकर) यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुधीर मुंडेकर यांनी केले. प्रास्ताविक तसेच वधू–वरांची माहिती खजिनदार श्री. सुभाष चव्हाण आणि श्री. अनंत गुरव यांनी उपस्थितांना दिली.
संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत धोंडू मोरे हे वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल असल्याने, त्यांच्या अनुपस्थितीत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद श्री. राजेंद्र गुरव यांनी भूषविले. त्यांनी समाजातील विवाह जुळविताना पालकांना येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
आभार प्रदर्शनाच्या वेळी प्रमुख कार्यवाह श्री. गणपत लाड यांनी विवाह समितीतील श्री. सुभाष चव्हाण, श्री. रघुनाथ गुरव, श्री. महेश गुरव, श्री. मोहित चव्हाण, श्री. गोविंद गुरव तसेच कार्यकर्ते श्री. विलास गुरव, अनिल गुरव, विजय गुरव, राजेश शंकपाळ आणि कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष योगदान देणाऱ्या सर्व महिलांचे मनःपूर्वक आभार मानले.
शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

