(नवी मुंबई)
इच्छापूर्ती दत्त दिगंबर स्वामी मंदिर येथे दरवर्षी प्रमाणे दत्त जयंती सोहळा मोठया उत्साहात संपन्न झाला. या उत्सवाची सुरुवात अनुष्टानाने झाली.
2 डिसेंबर या दिवशी अनुष्टानाची समाप्ती झाली. दिनांक 3 डिसेंबर या दिवशी सायंकाळी भव्यदिव्य अशी दत्त भगवान यांची मिरवणूक निघाली. यामध्ये ढोल पथक, छत्रपती शिवाजी महाराज यांची आश्ववरील वेशभूजा, मावळे,कोळी नृत्य, लेझिम पथक, विविध संत, देवता यांच्या वेष भुशे मधील कलाकार सहभागी होऊन मिरवणूकीचा रंग वाढविला. यानंतर दत्त जन्म सोहळा ॐ श्री श्री 1008 महामंडलेशवर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
दिनांक 4 डिसेंबर दत्त जयंती मुख्य दिवशी विविध धार्मिक, सामाजिक उपक्रम पार पडले. सकाळी अभिषेक, महायज्ञ् सोहळा पार पडला. यानंतर दुपारी प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन यांनी उपस्थित महाआरती पार पडली. यानंतर महाप्रसाद सुरु झाला.
दिवसभरात 10000 पेक्षा जास्त भाविकानी महाप्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी 5 वाजता महाआरती सुप्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख यांच्या उपस्थितीत पार पाडली. दिवसभरात राजकीय, प्रशासकीय, सामाजिक, अशा विविध क्षेत्रातील मान्य वरांनी दत्त जयंती सोहळ्याला उपस्थिती लावली. हा संपूर्ण कार्यक्रम मठाधिपती दिगंबर स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदिर कमिटीच्या सर्व सभासदानी मेहनत घेतली. दिवसभरात हजारो भाविकानी भगवान दत्त दर्शनाला उपस्थित होते.

