(रत्नागिरी)
जि. प. आदर्श शाळा पूर्णगड नं.१ शाळेचा १२० वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला. शाळा स्थापन होऊन १२० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त शाळेचा परिसर आकर्षक पद्धतीने सजवण्यात आला होता, शाळेचा जयघोष करत रॅली काढण्यात आली.
शाळेच्या वाढदिवसानिमित्त केकही कापण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांना गोड खाऊ देण्यात आला. या उपक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती, पालक, ग्रामस्थ या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. उपक्रम यशस्वीततेसाठी मुख्याध्यापिका भारती तायशेटे, शिक्षक-पूर्वा वाकडे, भारती शिंगाडे, राजेंद्र रांगणकर, विशेष शिक्षिका तृप्ती शिरगावकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
शाळेने हे वर्ष संकल्प वर्ष म्हणून साजरे करण्याचे ठरवले आहे. शाळेच्या या उपक्रमाविषयी शिक्षण विस्तार अधिकारी बीट पावस हिरवे मॅडम, केंद्रप्रमुख श्री संजय राणे यांनीही शुभेच्छा दिल्या. शाळेच्या या विशेष उपक्रमाविषयी समाधान व्यक्त होत आहे.

