(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयातील १४ विद्यार्थ्यांची कोल्हापूर विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल तसेच स्पर्धेत विशेष क्रीडा पुरस्कार संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष, युवा नेते प्रतिक देसाई यांच्या कार्यालयाच्यावतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
यावेळी भारतीय युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष व युवा नेते प्रतिक देसाई, मोहिनी मुरारी मयेकर शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष, मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे संचालक, युवा नेते रोहित मयेकर, युवा कार्यकर्ते ऋषिकेश उर्फ बंटी सुर्वे, प्रसाद देसाई,बबल्या देसाई, राकेश खेऊर तसेच क्रीडाशिक्षक संतोष सनगरे, विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी प्रतिक देसाई व रोहित मयेकर यांनी विद्यार्थ्यांच्या विभागीय निवडीबद्दल आनंद व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना जाकादेवी येथील वारेकर फिटनेस जीममध्ये विद्यार्थ्यांना व्यायाम शाळेमध्ये सवलतीच्या दरामध्ये व्यायामाची संधी उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रतिक देसाई यांनी घोषित केले. या सवलतीच्या दरात व्यायामासाठी सवलत दिल्याबद्दल युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रतिक देसाई यांचे विद्यार्थी व क्रीडाशिक्षक यांनी आभार व्यक्त केले.