( मुंबई / प्रतिनिधी )
मुंबईतील जोगेश्वरी मसाजवाडी येथील १० वर्षांच्या चिमुकली इरा संपदा पराग जोशी हीने एका मिनिटात (हूला हुप घूमाव) पायात १७३ वेळा रींग फीरवणेचा विक्रम करत आपले नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नोंद करण्यात यश मिळविले आहे.
एस. एम. शेट्टी इंटरनॅशनल स्कूल पवई या शाळेची विद्यार्थिनी असून ती कोविड काळापासून “हुला हूप” हा खेळ online पाहून शिकली होती. तीला चेन्नई येथील चेन्नई हुपर ट्रैनिंग अकॅडमी यांचे मार्गदर्शन लाभले. त्या अकॅडमीच्या मार्गदर्शनाखाली चेन्नई येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत सहभागी होत तीने या विक्रमाला गवसणी घालत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये आपले नाव कोरले. इरा ही जोगेश्वरी येथील प्रसिद्ध व्यावसायिक सुभाष (नाना) सप्रे(वडेवाले) व जेष्ठ पत्रकार सुरेश सप्रे यांची नात आहे.
तिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे खासदार रविंद्र वायकर, सौ. मनिषा वायकर विक्रोळी, आम.सुनिल राऊत, जेष्ठ कामगार नेते बाबा कदम यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

