(गावखडी / वार्ताहर)
राजापूर तालुक्यातील कशेळी येथील श्री दत्त मंदिरात ओम गुरुदत्त शिष्य मंडळ मुंबई–कशेळी आणि स्थानिक भक्तगण यांच्या वतीने यंदाही दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
दि. 4 डिसेंबर 2025 रोजी पहाटे 5 वाजता काकड आरतीने कार्यक्रमांची सुरुवात झाली. त्यानंतर सप्तदेवतांची पूजा, होम–हवन आणि गुरुचरित्र पारायण पार पडले. दुपारी 12 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी 4 वाजता आनंदाबुवा होळकर यांनी श्री दत्त जन्मावरील कीर्तन केले. सायंकाळी 6 वाजता श्री दत्त जन्मोत्सवानंतर ओमध्वनी, आरती आणि पालखी प्रदक्षिणा काढण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओम गुरुदत्त शिष्य मंडळ मुंबई–कशेळी तसेच स्थानिक भक्तगण व भाविक यांनी उत्साहाने परिश्रम घेतले.

