(रत्नागिरी)
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विदयापीठ अंतर्गत सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे “गोडया पाण्यातील मत्स्य शेती” या विषयावर दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रम दि. ०२ ते ०३ डिसेंबर २०२५ या कालावधीत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विदयापीठ, दापोलीचे सन्मानिय कुलगुरु डॉ. संजय भावे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे व विस्तार शिक्षण संचालक डॉ. मकरंद जोशी यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.
प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्घाटन कार्यक्रम दि. ०२ डिसेंबर २०२५ रोजी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. केतन चौधरी आणि कृषी विज्ञान केंद्र रत्नागिरी चे कार्यक्रम समन्वयक व प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अंनत हनुमंते यांच्या हस्ते पार पडला. यावेळी डॉ. चौधरी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये गोवा राज्य व कोकण कृषी विद्यापीठाचे एकसंघ असे संबध असल्यामुळे हा प्रशिक्षणास गोवा राज्यातील शेतकरी प्रशिक्षणार्थी उपस्थिती चांगली आहे. तसेच आज रत्नागिरी शहरात नगरपालिका निवडणूक असूनही “शेतकरी प्रथम” या तत्वानुसार केंद्रातील अधिकारी व कर्मचारी यांनी सकाळी लवकर निवडणुकीचे कर्तव्य बजावून प्रशिक्षण आयोजित केले त्याबद्दल कौतुक केले.
या कार्यक्रमाची प्रस्तावना सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे प्राध्यापक डॉ. आसिफ पागरकर यांनी केली. प्रमुख पाहुणे कृषी विज्ञान केंद्र रत्नागिरी चे कार्यक्रम समन्वयक व प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अंनत हनुमंते यांनी आपल्या भाषणामध्ये प्रशिक्षणांर्थीनी गटशेती करून आपल्या उद्योगाला कसा फायदा होईल याबद्दल विचार करावा व आपली याशोगाथा हीच या प्रशिक्षणाचे फलित असेल. यावेळी प्रादेशिक कृषी कार्यालय, बर्डेझ, गोवा चे कृषी अधिकारी श्रीमती पूजा महालकर उपस्थित होत्या. सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे प्रा. सचिन साटम, सहाय्यक संशोधन अधिकारी, आणि श्रीमती वर्षा सदावर्ते, जीवशास्रज्ञ हे उपस्थितीत होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अपूर्वा सावंत, वरिष्ठ संशोधन सहाय्यक यांनी तर आभार प्रदर्शन श्री.. नरेंद्र चोगले, सहाय्यक संशोधन अधिकारी यांनी केले.
या प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता गोवा व महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातून प्रशिक्षणांर्थीनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम दरम्यान “गोडया पाण्यातील मत्स्य शेती सद्यस्थिती व भविष्य तसेच मत्स्य-शेती प्रकल्प अहवाल” याविषयी डॉ. केतन चौधरी यांनी, तर “माशांचे रोग व व्यवस्थापन” याविषयी डॉ. आसिफ पागरकर यांनी मार्गदर्शन केले, “मत्स्यशेत पूर्व तयारी तसेच माशांची वाढ व नोंदी” याविषयी श्री. नरेंद्र चोगले, “माशांची बीज ओळख, वाहतूक व संगोपन” याविषयी डॉ. वैभव येवले, “जागेची निवड आणि तलाव बांधकाम” याविषयी डॉ. राकेश जाधव, “माशाच्या जाती” तसेच “मत्स्यशेतीमध्ये पाण्याचे व्यवस्थापन” विषयी श्रीमती वर्षा सदावर्ते, तर “मत्स्य खाद्य व्यवस्थापन” विषयी अपूर्वा सावंत यांनी मार्गदर्शन केले. “जलशायातील पिंजरा मत्स्य संवर्धन” यावर कृपेश सावंत, “मासे काढणी” यावर सुशील कांबळे तर “काढणी पश्चात काळजी” यावर प्रा. सचिन साटम यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचा समारोप समारंभ दि. ३ डिसेंबर २०२५ रोजी पार पडला. सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. केतन चौधरी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये शेतकर्यांच्या मागणी नुसार या संशोधन केंद्रात विविध प्रशिक्षण आयोजित केली जातात. यशस्वी उद्योजक होण्याकरिता प्रशिक्षण घेतल्यानंतर लवकरात लवकर उद्योगास सुरवात करणे आवश्यक आहे, असे सांगितले. प्रादेशिक कृषी कार्यालय, बर्डेझ, गोवा चे कृषी अधिकारी श्रीमती पूजा महालकर यांनी गोवातील शेतकर्यांकरिता खास प्रशिक्षण आयोजित केल्याबद्दल आभार व्यक्त केले.
प्रशिक्षणांर्थी श्री. विजय कुरतडकर यांनी आपल्या मनोगतामध्ये हा प्रशिक्षणामध्ये संपूर्ण माहिती आणि कौशल्ये मिळाली असून भविष्यात विस्तृत माहिती घेण्याकरिता संशोधन केंद्रासोबत संपर्कात राहणार असल्याचे तर श्री. डॅनियल फेराओ यांनी सर्व विषय शास्त्रोक्त व सोपा पद्धतीने शिकविल्यामुळे सहजपणे समजले व मस्त्य तलावातील पाण्याचा वापर करून सेंद्रिय शेती करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच कुमारी सिया गांवकर हिने शेती सोबत मत्स्य पालनाचे महत्व हे प्रशिक्षण केल्यामुळे समजले असे सांगून हा प्रशिक्षणाचे भविष्यात स्वत:चा उद्योग सुरु करण्यासाठी उपयोग होईल असे प्रतिपादन केले.
सदर प्रशिक्षण यशस्वी करण्यास श्री. रमेश सावर्डेकर, श्री. श्रीकांत तांबे, श्रीमती जाई साळवी, श्री. दिनेश कुबल, श्री. महेश किल्लेकर, श्री. मनिष शिंदे, श्री. अण्णासाहेब कारखेले, श्रीमती भूमी भाटकर, श्री. सुहास कांबळे, श्री. सचिन चव्हाण, श्री. राजेंद्र कडव, श्री. प्रविण गायकवाड तसेच कंत्राटी मजूर श्री. तेजस जोशी, श्री योगेश पिलणकर, श्री. अभिजित मयेकर, श्री. उल्हास पेडणेकर, श्री. प्रशांत पिलणकर, श्री. केतन चव्हाण आणि श्री दर्शन शिंदे यांनी मेहनत घेतली.

