(दापोली)
हर्णे बायपास येथे आज दुपारी सुमारे १२ ते १२:३० वाजताच्या दरम्यान पुणे येथून आलेल्या पर्यटकांची मिनीबस पलटी होऊन गंभीर अपघात झाला. MH 14 GU 1616 या क्रमांकाच्या मिनीबसमध्ये पिंपरी चिंचवडमधील पाच कुटुंबीय प्रवास करत होते.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पर्यटक जवळील एका हॉटेलमध्ये थांबले होते. तेथून घरी परतण्यासाठी निघताना चालक रिव्हर्स घेत असताना अंदाज चुकला आणि मिनीबसचा तोल सुटून ती थेट रस्त्याच्या कडेला पलटी झाली. अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या अपघातात १० पर्यटक जखमी झाले असून काहींना किरकोळ तर काहींना मध्यम स्वरूपाच्या दुखापती झाल्या आहेत. जखमींची नावे पुढीलप्रमाणे :
क्षितीज अशोक गुगणे (३५)
आरोही पराग गायकवाड (४)
पराग पर्शुराम गायकवाड (४०)
नेहा पराग गायकवाड (३५)
हितेश रमेश चौधरी (४०)
ओजस अक्षय कुलकर्णी (५१)
सुरेश साहेबराव कुचेकर
महेश दत्तात्रय वाघमारे (३९)
प्राजक्ता महेश वाघमारे (३६)
(एक इतर जखमी पर्यटक)
जखमींना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र, आसूद येथे प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना दापोली उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. स्थानिक प्रशासनानुसार, सर्व जखमींची प्रकृती स्थिर असून आवश्यक उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. अपघातामुळे काही काळ परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती.

