( संगमेश्वर / प्रतिनिधी )
संगमेश्वर तालुका माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आणि विद्या समिती आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व, निबंध स्पर्धेत पैसा फंड इंग्लिश स्कूल संगमेश्वरच्या कु.क्रिशा कपिल इंदानी (इयत्ता ८वी) हिने माध्यमिक गटात दोन्ही स्पर्धेत तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. याबरोबरच प्रशालेने चित्रकला आणि कथाकथन स्पर्धेतही उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे.
सदर स्पर्धा संगमेश्वर तालुक्यातील माध्यमिक विद्यामंदिर ताम्हाने येथे मंगळवारी संपन्न झाली. यामध्ये क्रिशा इंदानी ( इ ८ वी ) हिने वक्तृत्व आणि निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. याबरोबरच चित्रकला स्पर्धेत प्राथमिक गटात हिर किशोर पटेल ( इ ७ वी ), माध्यमिक गटात रिषभ विश्वनाथ नरबेकर ( इ ९ वी ) यांनी अनुक्रमे तृतीय क्रमांक प्राप्त केला. याबरोबरच प्राथमिक गटात कथाकथन स्पर्धेत विजय लालासो टकले ( इ ६ वी ) याने उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले.
क्रिशा इंदानीसह, हिर पटेल, रिषभ नरबेकर, विजय टकले यांनी प्राप्त केलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे व्यापारी पैसा फंड संस्थेचे अध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष किशोर पाथरे, सचिव धनंजय शेट्ये, सदस्य संदीप सुर्वे, रमेश झगडे, मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक प्रकाश दळवी आदींनी अभिनंदन केले आहे.

