(देवरूख / सुरेश सप्रे)
मौजे करक तांबळवाडी येथील आत्माराम गंगाराम कांबळे यांच्या नवीन बांधकाम चालू असलेल्या घराजवळ लोखंडी तारेच्या कोंबड्यांच्या खुराड्यामध्ये बिबट्या अडकला असल्याची माहिती पोलीस पाटील करक यांनी वनपाल राजापूर यांना भ्रमणध्वनी दिली. वनविभागामार्फत दखल घेत घटनास्थळी धाव घेतली व खुराड्याच्या लोखंडी तारा कापून त्याला पिंजऱ्यात सुरक्षित कैद केले.
सदरची घटना परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांना कळवून, त्यांचे समवेत वनपाल राजापूर, वनरक्षक राजापूर व रेस्क्यू टीमसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली, सदरची परिस्थिती लक्ष्यात घेऊन प्रथमदर्शी बिबट्या अडकलेल्या लोखंडी तारेच्या खुरड्याला ग्रीन शेड नेट गुंडाळून घेऊन पिंजरा लावून बिबट्या अडकला असलेल्या खुराड्याच्या लोखंडी तारा कापून त्याला पिंजऱ्यात सुरक्षित घेऊन पशुधन विकास अधिकारी राजापूर यांचेकडून तपासणी केली.
सदरचा बिबट्या हा मादी जातीचा असून त्याचे वय एक ते दीड वर्ष असल्याची व तो सुस्थितीत असलेची माहिती पशुधन विकास अधिकारी राजापूर यांनी सांगितले.
सदरची कार्यवाही विभागीय वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्रीम.गिरिजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण श्रीम.प्रियांक लगड, वनक्षेत्रपाल रत्नागिरी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली केली. सदर बिबट्या सुस्थितीत असल्याने नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
सदर कामगिरीसाठी रत्नागिरी , वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार, वनपाल राजापूर जयराम बावदाणे, वनरक्षक राजापूर विक्रम कुंभार, वनरक्षक जालने व रेस्क्यू टीमचे दीपक चव्हाण, दीपक म्हादये, शनितेश गुरव, अमित बाणे, निलेश म्हादये उपस्थित होते