(मुंबई)
मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात मोठा आणि सर्वाधिक प्रतीक्षित रिअॅलिटी शो बिग बॉस मराठी आपल्या सहाव्या सीझनसह लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. महाराष्ट्रातच नाही तर जगभरातील मराठी प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरणारा हा शो सुरू होण्याची चाहूल लागताच रसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. एंटरटेनमेंटचा बार उडवणारे बिग बॉसचे घर पुन्हा सज्ज होत असून, प्रेक्षकांच्या मनात नवीन उत्सुकतेची खळबळ उडाली आहे.
यंदाचा USP काय असणार?, थीम कशी असेल?, सदस्य कोण असतील?, घराचं स्वरूप कसं असेल?, गेम प्लॅन किती वेगळा असेल? आणि सर्वात महत्त्वाचं—यंदाही सूत्रसंचालन रितेश देशमुख करतील का? या प्रश्नांनी प्रेक्षकांच्या चर्चेला उधाण आलं आहे.
कलर्स मराठीच्या खास टीझरने मात्र एक मोठा संकेत दिला आहे, या वर्षी एक नाही, तर अनेक दरवाजे असणार आहेत! टीझरमध्ये दिसणारे वेगवेगळे दरवाजे, त्यातून येणारा प्रकाश, रहस्यमय वातावरण आणि अनोखी डिझाईन हे स्पष्ट दाखवतात की सीझन 6 पूर्वीच्या सर्व सिझनपेक्षा अधिक दमदार आणि अनपेक्षित असणार आहे.
टीझर काहीही उघड न करता प्रेक्षकांना पूर्णपणे गुंतवून ठेवतो आणि “या वेळी दार उघडणार… नशिबाचा गेम पालटणार!” अशी जोरदार फक्त हिंट देतो. सध्या स्पर्धकांची यादी, घराची पहिली झलक, अधिकृत थीम आणि या वर्षीचे मोठे ट्विस्ट हे सर्व अद्याप गुप्त ठेवले असले तरी लवकरच ते सर्व उलगडणार आहे. महाराष्ट्रभर पुन्हा एकदा “Bigg Boss आदेश देत आहेत!” हा आवाज घुमण्याची तयारी सुरू झाली आहे.
मनोरंजनाचा बाप बिग बॉस मराठी सीझन 6, लवकरच कलर्स मराठी आणि JioHotstar वर!

