( चिपळूण )
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई व नवनिर्माण शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलन’ निमित्त युवकांसाठी आयोजित स्वलिखित काव्य वाचन व निबंध स्पर्धेत श्री. आनंदराव पवार महाविद्यालयाने चमकदार कामगिरी केली आहे.
कनिष्ठ महाविद्यालयीन गटातील कु. वैष्णवी गजानन हळदे हिने निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक, तर १६ ते ३५ वर्षे वयोगटातील कु. वेदिका विष्णू हरवडे हिने युवारंग स्वलिखित काव्य वाचन स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवत महाविद्यालयाचा गौरव वाढविला आहे. या दोन्ही विद्यार्थिनींना प्रा. रुपेश भालेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
शनिवार, दि. २२ नोव्हेंबर रोजी चरित्रकार धनंजय कीर साहित्यनगरी, एस. एम. जोशी विद्यानिकेतन, रत्नागिरी येथे झालेल्या जिल्हा साहित्य संमेलनात कवी श्री. अनंत राऊत यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास कोंकण मराठी साहित्य परिषद दक्षिण अध्यक्ष श्री. अरूण मोर्ये उपस्थित होते.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. उदयशेठ गांधी, मुख्य कार्यकारी अधिकारी व चेअरमन श्री. मल्लेश लकेश्री, कार्याध्यक्षा सौ. सई वरवाटकर, कोषाध्यक्ष श्री. सिद्धेश लाड, कार्यवाह श्री. प्रशांत देवळेकर, पी.आर.ओ. योगेश चोगले, रजिस्ट्रार अजित खेडेकर, प्राचार्य श्री. भाऊ कांबळे, प्राचार्या सौ. अरुणा सोमण तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी दोन्ही विद्यार्थिनींचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

