(रत्नागिरी)
महाराष्ट्र राज्य धनुर्विद्या असोसिएशनतर्फे आयोजित राज्य ज्युनिअर धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धा (पुरुष व महिला) सन २०२५-२६ चे आयोजन वाशिम येथे ४ ते ७ डिसेंबर २०२५ या कालावधीत करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी ०१/०१/२००५ नंतर जन्मलेले खेळाडू पात्र आहेत. स्पर्धा कंपाऊंड, रिकर्व आणि इंडियन अशा तीन प्रकारांत होणार आहे.
या अनुषंगाने रत्नागिरी जिल्हा निवड चाचणी व जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धा दि. २५ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही चाचणी श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, खुल्या नाट्यगृहाशेजारी, मारुतीमंदिर, रत्नागिरी येथे होणार असून, पात्र खेळाडूंनी क्रीडासाहित्य व वयाचा मूळ दाखला घेऊन सकाळी ९.०० वाजता उपस्थित राहावे.
सदर निवड चाचणीच्या आधारे रत्नागिरी जिल्हा संघाची निवड केली जाईल. प्रत्येक प्रकारात ६ पुरुष व ६ महिला अशा एकूण १२ खेळाडूंची निवड केली जाणार आहे. संबंधित गटात किमान ४ स्पर्धकांचा सहभाग असल्यास पहिल्या तीन क्रमांकांना पदक देण्यात येईल.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा तिरंदाजी असोसिएशन, रत्नागिरीच्या सचिवा सौ. समिधा संजय झोरे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क: 📞 मार्तंड झोरे – ९३७०२१५५२२, 📞 समिधा झोरे – ९०२१३८१८५८ / ९८८१२२७६९९ यांचेशी संपर्क करावा.

