(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील सार्वजनिक नवरात्रोत्सव मित्र मंडळ जाकादेवी- खालगाव आणि सार्वजनिक सत्यनारायण पूजा कमिटी यांच्या संयुक्त विद्यमान जाकादेवी येथे नवरात्र उत्सवाला भक्तिभावाने उत्साहात प्रारंभ झाला असून या उत्सवानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्य सोमवार दि. २२ सप्टेंबर रोजी देवीचा आगमन सोहळा अतिशय उत्साह संपन्न झाला. यावेळी देवीची प्राण प्रतिष्ठापना मोठ्या भावाने करण्यात आली. मंगळवार २३ रोजी रात्री ८.३० वाजता दांडिया तर १० वाजता जाखडी डबलबारी नाचाचा जंगी सामना संपन्न झाला. यामध्ये शक्तीवाले शाहीर आणि तुरेवाडी शाहीर असा सामना रंगला होता.
बुधवार २४ रोजी रात्री ९ वाजता दांडिया, गुरुवार २५ रोजी सार्वजनिक सत्यनारायण पूजा कमिटी जाकादेवी आयोजित सत्यनारायणाची महापूजा दुपारी १२ वाजता महाप्रसाद, रात्री १० वाजता श्रीराम मंडळ श्रीराम नमन नाट्य मंडळ हुमणेवाडी कामथे चिपळूण यांची स्त्री पात्रात नटलेले युट्युब चॅनेलवर गाजत असलेले बहुरंगी नमन, शुक्रवार २६ रोजी १० वाजता जाखडी डबलबारी नाचाचा जंगी सामना- शक्तीवाले शाहीर विरुद्ध तुरेवाले शाहीर, शनिवार २७ रोजी सायंकाळी ४ वाजता लहान मुलांचे फनी गेम्स, रात्री साडेआठ वाजता होम मिनिस्टर- २०२५ पहिला राऊंड, रात्री १० वाजता दांडिया गरबा, रविवार २८ रोजी सायंकाळी चार वाजता लहान मुलांचे फनी गेम्स, रा .८.३० होम मिनिस्टर- दुसरा राऊंड, रात्री दहा वाजता दांडिया गरबा सोमवार २९ रोजी सकाळी १० वाजता जाकादेवी नवरात्रोत्सवात प्रथमच पारंपारिक राम-रावण युद्ध नृत्य स्पर्धा आदी कार्यक्रम होणार आहेत.
मंगळवार ३० रोजी रात्री ८.३० वाजता होम मिनिस्टर-फायनल राऊंड, रात्री १० वाजता दांडिया गरबा बुधवार १ ऑक्टोबर रोजी रात्री ८३० वाजता फॅन्सी ड्रेस स्पर्धा, रात्री १० वाजता बक्षीस वितरण समारंभ, गुरुवारी २ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता देवीचा विसर्जन सोहळा, भव्य दिव्य रोषणाई आणि डीजेच्या तालावर संपन्न होणार आहे.
तरी या सर्व कार्यक्रमांसाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पूजा कमिटी अध्यक्ष, युवक नेते ऋषिकेश उर्फ बंटी सुर्वे, खजिनदार गजानन कोवळे, सचिव अमित दुधाळे, उपाध्यक्ष सुधीर देसाई (उद्योजक ),सार्वजनिक नवरात्र उत्सव मित्र मंडळ जाकादेवी खालगांव यांनी केले आहे.

