(मुंबई)
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे बिगुल वाजले असून, पहिल्या टप्प्यात नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुका होत आहेत. इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर, प्रचार मोहिमेदरम्यान होणाऱ्या विविध खर्चावर मर्यादा ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने खर्चाचे दर निश्चित केले आहेत.
निवडणूक प्रचारादरम्यान चहापान, जेवण, सभा, रॅली, जाहिराती आणि प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांचा खर्च उमेदवारांनी नियमानुसार नोंदवणे बंधनकारक आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व राजकीय पक्षांच्या बैठकीत हे दर निश्चित केले असून, उमेदवारांना निवडणुकीदरम्यान त्याच दरानुसार खर्चाची नोंद ठेवावी लागणार आहे.
उमेदवारी अर्ज दाखल झाल्यापासून प्रत्येक उमेदवाराला राष्ट्रीयीकृत किंवा सहकारी बँकेत स्वतंत्र खाते उघडणे आवश्यक आहे. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून दिल्या जाणाऱ्या ‘खर्च नोंदवही’मध्ये दैनंदिन खर्चाची नोंद करावी लागेल.
खाद्यपदार्थांचे दर:
चहा – ₹१०
कॉफी – ₹१५
पोहे – ₹२०
वडापाव – ₹१५
भजे प्लेट – ₹२०
पाणी बाटली – ₹१७
मिसळपाव – ₹६०
पावभाजी – ₹६०
व्हेज थाळी (स्पेशल) – ₹१८०
नॉनव्हेज थाळी – ₹२४०
बिर्याणी – ₹१५०
इतर खर्चाचे दर:
फुलांचा लहान हार – ₹३०
फुलांचा मोठा हार – ₹८०
गांधी टोपी – ₹१०
फेटा – ₹१९०
ढोल-ताशा (प्रतिव्यक्ती) – ₹५००
मंडप – ₹१५ प्रति चौ. फूट
खुर्ची (प्लास्टिक) – ₹१० प्रतिदिवस
व्हीआयपी सोफा – ₹१,५००
पिण्याच्या पाण्याचा टँकर – ₹२,२००
माहितीपत्रक (A4 आकार, १००० प्रतींसाठी) – ₹४,२५०
अंगरक्षकासाठी दर निश्चित
निवडणुकीदरम्यान अंगरक्षकाची गरज भासणाऱ्या उमेदवारांना प्रतिदिन ₹१,००० इतका दर निश्चित करण्यात आला आहे. हा खर्च देखील निवडणूक खर्चाच्या नोंदीत समाविष्ट केला जाणार आहे.

