(संगमेश्वर)
संगमेश्वर तालुक्यातील निढळेवाडीची केवळ सहा वर्षीय कन्या श्रीशा अनुप पिंपरकर हिने आपल्या बुद्धिमत्ता आणि वक्तृत्वाच्या जोरावर राज्यभरात चमक दाखवली आहे. ‘चिन्मय मिशन मुंबई’तर्फे आयोजित चिन्मय गीता फेस्ट २०२५ या प्रतिष्ठित स्पर्धेतील राज्यस्तरीय फेरी नुकतीच पुण्यात पार पडली.
या स्पर्धेत श्रीशाने ‘श्रीमद्भगवद्गीता – अध्याय १५ पुरुषोत्तम योग’ या विभागात उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे आता तिची येत्या २९ नोव्हेंबर २०२५ रोजी होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
श्रीशाच्या या यशाबद्दल तिच्यावर कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. लहान वयात मिळवलेले हे यश तिच्या चिकाटीचे आणि अभ्यासू वृत्तीचे द्योतक ठरत आहे.

