( संगमेश्वर )
कोसुंब (ता. संगमेश्वर) येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र संचलित श्री भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय, रत्नागिरी आणि शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात नागरिकांसाठी जनरल तपासणी, रक्तदाब तपासणी, शुगर तपासणी तसेच मोफत औषध वितरण करण्यात येणार आहे. शिबिरात सहभागी होणाऱ्या रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज लागल्यास त्या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात येतील, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.
या उपक्रमाला जिजाऊ संस्थेचे संस्थापक श्री. निलेश भगवान सांबरे आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. रोहन बने यांचे मार्गदर्शन लाभले आहे. शिबिरात तपासणीसाठी येणाऱ्या नागरिकांनी आपले जुने वैद्यकीय रिपोर्ट्स सोबत आणावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
सदर आरोग्य शिबिर रविवार, दिनांक ९ नोव्हेंबर २०२५ रोजी कोसुंब जिल्हा परिषद शाळा क्र. १ येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी शिवसेना संगमेश्वर तालुका प्रमुख श्री. प्रमोद पवार, जिजाऊ सदस्य श्री. राजेश (राजू) धामणे, कु. स्वरूप सावंत तसेच सर्व शिवसैनिक आणि जिजाऊ परिवारातील पदाधिकारी यांनी पुढाकार घेतला आहे. अधिक माहितीसाठी स्वरूप सावंत (९४०३७६७००१), किरण जाधव (९४२२०५३५६४), समीर जाधव (९८६०७५७२३१) आणि राजेश (राजू) घामणे (७७७६९४८७२४) यांच्याशी संपर्क साधावा.

