(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील नायरी बिट अंतर्गत, अंगणवाडी कसबा येथे नायरी बिट मधील सर्व अंगणवाडी केंद्र यांच्या संयुक्त उपस्थितीत ८ वा राष्ट्रीय पोषण अभियान कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमास तालुक्याचे सहाय्यक गट विकास अधिकारी तथा बालविकास प्रकल्प अधिकारी श्री.विनोदकुमार शिंदे यांची उपस्थिती लाभली. तसेच पंचायत विकास अधिकारी श्री. खंडागळे, कोंडउमरे आरोग्य केंद्रातील श्री. माने, श्री.लांडे व इतर कर्मचारी बीट पर्यवेक्षिका सौ.अमृता नरोटे मॅडम, कसबा गावातील पालक ग्रामस्थ, प्राथमिक शाळा शिक्षकवृंद श्रीम.देवरुखकर व कवित्के मॅडम व नायरी बिट मधील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांची उपस्थिती होती.
सदर कार्यक्रमामध्ये पोषण महाकार्यक्रम अंतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात आले. पाककृती प्रदर्शन ,डोहाळे जेवण, सुपोषण दिवस, अर्ध वार्षिक वाढदिवस, HB व शुगर तपासणी, रांगोळी प्रदर्शन, असे विविध कार्यक्रम घेण्यात आले.
कार्यक्रमास उपस्थित पालक यांना श्री. शिंदे यांनी मार्गदर्शन केले. तसेच बीट पर्यवेक्षिका, कसबा ग्रामपंचायतचे पंचायत विकास अधिकारी, आरोग्य कर्मचारी, प्राथमिक शाळा शिक्षिका देवरुखकर मॅडम यांनी मार्गदर्शन केले.
या संपन्न झालेल्या कार्यक्रमात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी तयार केलेल्या विविध पाककृती प्रदर्शन आणि रांगोळी प्रदर्शन यांचे उपस्थित पाहुणे यांनी विशेष कौतुक केले. बीटच्या पर्यवेक्षिका नरोटे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बिट मधील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या सहकार्याने पोषण महाकार्यक्रम संपन्न झाला.
या सर्व कार्यक्रमांचे सूत्रसंचालन सौ. सोनाली प्रसाद महाडिक यांनी केले. मान्यवरांच्या उपस्थितीत आनंदी व उत्साही वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.

