(गुहागर)
कोकणात होळीचा सण आगळावेगळा पध्दतीने साजरा केला जातो. फाल्गुन महिना सुरू झाला की साऱ्यांनाच होळीचे वेध लागायला सुरुवात होते. वसंत ऋतूच्या आगमनाची चाहुल देणारा हा सण देशभरात वेगवेगळ्या स्वरूपामध्ये साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये कोकण भागामध्ये होळीचा सण हा शिमगा म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे रत्नागिरी ग्रामदेवतांची “पालखी नाचवणं” हा मोठा उत्सव साजरा केला जातो.
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील तवसाळ गाव पंचक्रोशीतील शिमगोत्सवला सुरुवात फाग पंचमीला पहिली होळी पेटवून सुरुवात होते, तर आई श्री महामाई सोनसाखळी देव रवळनाथ त्रिमुखी सोमजाई यांचा जोगवा घेऊन तिसऱ्या दिवशी भोवनीचे खेळे गाव भेटीसाठी बाहेर पडतात. पाच दिवस गाव भेट झाल्यावर तवसाळ पंचक्रोशीचे एकुण १२ होम साजरे होतात तर ९ होम वाडीवाडीत साजरे पुढील ३ श्री महामाई सोनसाखळी देवीच्या चरण स्पर्शाने होमा भोवती पाच भोवर्या घेत खांद्यावर आई श्री महामाई सोनसाखळी देवीची पालखी ढोलाच्या गजरात अशा भव्य दिव्य शिमगोत्सव कार्यक्रम होत असतो.
शिमगोत्सव रूपरेषा मंदिर ट्रस्ट तवसाळ
गुरुवार दिनांक 13/03/2025 या दिवशी रात्री ठिक 10.30 वाजता देवीचा रूपा लागेल व त्या नंतर मंदिरातून पालखी होमावर जाईल. शुक्रवार दिनांक 14/03/2025 सकाळी ठिक 10.30 वाजता श्री महामाई सोनसाखळी मंदिर परिसरात जत्रा भरते, पुढे पालखी मंदिरातून हळदी कुंकवासाठी तवसाळ खुर्द गावात येईल. पहाटेपर्यंत हळदी कुंकू तवसाळ खुर्द मध्ये फिरवली जाते.
शनिवार दिनांक 15/03/2025 सकाळी 11.00 वाजता पालखी होमावर जाते, नंतर 12.00 वाजता होम पेटवला जाईल. येथे सर्वात मोठ्या जत्रेचे स्वरूप आलेले असते. पालखी थेट फेरीबोटीतून परंपरेनुसार समुद्रात नारळ अर्पण करण्यासाठी घेऊन जातात. हे फेरीबोटील विहंग दृश्य पहायला विलोभनीय असते. अनेक बाजुच्या गावातील मंडळी या उत्सवात सामील होत असतात. ढोलाच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक सोहळा रंगतो.
त्यानंतर तवसाळ ग्रामस्थ मंडळाचा तमाशा होतो, दुपारी 2.00 वाजता पालखी सहाणेवर येते, त्यानंतर पालखी दुपारी 3.30 वाजता तवसाळ आगरमध्ये होमावर जाईल, व सायंकाळी पालखी तवसाळ खुर्द गावाच्या सहानेवर विराजमान होईल. अशा प्रकारे तवसाळ गाव पंचक्रोशीचा पारंपरिक शिमगोत्सव साजरा केला जातो.
श्री देवी आई महामाई सोनसाखळी देवीच्या सर्व भाविकांनी पालखी दर्शनाचा लाभ घ्यावा व शिमगोत्सवाचा आनंद लुटावा असे आवाहन देवस्थान ट्रस्ट तर्फे करण्यात आले आहे.