(पाली / वार्ताहर)
महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्र चिपळूण येथे काल महामार्ग पोलीस विभागाच्या (अतिरिक्त कार्यभार) सहाय्यक पोलीस निरीक्षक राणी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुक पोलीस विभागाच्या थकित दंड असणार्या वाहन मालकांकडून दंडात्मक रक्कम वसुलीची विशेष मोहिम राबविण्यात आली. त्याअंतर्गत वाहन मालक छैलसिंग परमार रा. एम.आय.डी.सी. लोटे लेवा केमिकल कंपनी यांचे मालकीच्या गाडी क्रमांक एमएच ०८ ऐऐन ५३३३, एमएच ०८ ऐएक्स ५३३३, एमएच ०८ ऐएक्स ७००७ या वाहनांवर मोटार वाहन अधिनियमाच्या विविध कलमांखाली वाहतुकीचे नियम भंग केल्याबाबत पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. त्यातील थकित असलेली दंडाची रक्कम रुपये ८८,७००/- वसूल करण्यात आलेली आहे.
ही कारवाई महामार्ग वाहतूक पोलीस विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक राणी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण वाहतूक पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र शिंदे,पोलीस हेडकॉन्स्टेबल बळीराम शिंदे, संदीप शिंदे,पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ आव्हाड, बाबूराव खोंदल यांनी केली आहे.

