(राजापूर)
पाचल पंचक्रोशी धनगर समाजतर्फे यंदा दसरा सोहळा २०२५ (पर्व दुसरे) भव्यदिव्य स्वरूपात साजरा होणार आहे. समाजातील बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग आणि पारंपरिक संस्कृतीचे साज सजवणारा हा सोहळा विशेष आकर्षण ठरणार आहे. हा सोहळा शुक्रवार, ३ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रभावती हॉल, पाचल येथे पार पडणार आहे.
धनगर समाजाचे पारंपरिक नृत्य आणि सांस्कृतिक कला फक्त समाजापुरती मर्यादित न ठेवता, लोककला म्हणून पुढे आणण्याचे उद्दिष्ट आयोजकांनी ठरवले आहे. याचाच भाग म्हणून, आवाजाचे बादशाह तुरेवाले देवेंद्र झिमन बुवा आणि शाहीर श्री संजय जोशी बुवा शक्तीवाले यांच्यात रंगणारा तुफान तुराचा सामना कार्यक्रमाला विशेष रंगत देणार आहे.
सोहळ्यात आयोजित मुख्य उपक्रमांमध्ये समावेश आहे –
- गजा नृत्य स्पर्धा
- कोकणची लोककला – शक्ती-तुरा
- हळदीकुंकू व पैठणी कार्यक्रम
- अहिल्यामातेच्या लेकींचा सन्मान
या भव्य सोहळ्यातून समाजातील ऐक्य, परंपरा आणि संस्कृतीचा गौरव साजरा केला जाणार आहे. तरी सर्व सहकुटुंब आणि सहपरिवार या उत्सवात उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पाचल पंचक्रोशी धनगर समाज आयोजकांनी केले आहे.

