(ठाणे)
डोंबिवली जवळच्या खंबाळपाड्यात एका ४ वर्षाच्या मुलीला आणि तिच्या मावशीला झोपेत असताना विषारी सापाने चावा घेतला, ज्यात मुलीचा मृत्यू झाला तर मावशी गंभीर अवस्थेत ठाण्याच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचाराखाली आहे. मृत मुलीचे नाव प्राणगी विकी भोईर असून ती आजदे गावातील भागीरथी अपार्टमेंटमध्ये राहत होती. शनिवार-रविवार सुट्टी असल्याने नर्सरीत शिकणारी प्राणगी तिच्या मावशी बबली उर्फ श्रुती अनिल ठाकूर (वय 23) कडे राहण्यासाठी गेली होती.
प्राणगी चे वडील विक्की भोईर डोंबिवलीत मंडप डेकोरेशनचे काम करतात. अनेक दिवस पत्नी माहेरी गेल्याने, त्यांनी पत्नी आणि मुलींना त्यांच्या माहेरी म्हणजेच खंबाळपाडा येथे पाठवले होते. सोबत तीन वर्षाची प्राणगी हीही गेली होती. रात्री प्राणगी तिच्या मावशीजवळ झोपली होती. रात्री गाढ झोपेत असताना ती अचानक जोरजोरात रडायला लागल्याने तिची मावशीची ताबडतोब उठली. प्राणगीच्या रडण्याचे कारण लक्षात न आल्याने, मावशीने तिला शेजारील रुममध्ये असलेल्या तिच्या आईकडे नेले, पण प्राणगीचे रडणे थांबत नव्हते. त्यावेळी सापाने प्राणगीला चावा दिला असल्याचे लक्षात आले आणि दरम्यान आपल्यालाही सापाने चावले असल्याचे मावशीला जाणवले.
प्राणगी आणि तिच्या मावशीला केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. डॉक्टरांनी प्राणगी आणि मावशी दोघींवर प्राथमिक उपचार केले, परंतु एक तासाच्या उपचाऱ्यानंतर प्राणगीची तब्येत आणखी बिघडली. आणि तिचा मृत्यू झाला. मावशी बबली सुरुवातीला शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये दाखल केली गेली, परंतु प्रकृती गंभीर असल्याने तिला ठाण्याच्या सिव्हील हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात हलवण्यात आले असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.

