(मुंबई)
यावर्षी आश्विन शुक्ल तृतीया तिथीची वृद्धी झाल्यामुळे नवरात्रोत्सव दहा दिवसांचा आहे. हा उत्सव सोमवार, २२ सप्टेंबरपासून १ ऑक्टोबरपर्यंत साजरा होणार असून गुरुवार, २ ऑक्टोबर रोजी विजयादशमी (दसरा) साजरी केली जाईल, अशी माहिती पंचांगकर्ते व खगोलशास्त्र अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.
नवरात्रातील नवरंगांविषयी माहिती देताना सोमण म्हणाले, “आश्विन महिन्यात शेतात तयार झालेले धान्य घरात येते. त्यामुळे नवरात्र उत्सव हा निर्मितीशक्तीचा, आदिशक्तीचा तसेच महिलांच्या सबलीकरणाचा उत्सव मानला जातो. नवरात्रात कोणता रंग परिधान करावा याबाबत कोणत्याही धर्मग्रंथात स्पष्ट उल्लेख नाही. मात्र हा उत्सव केवळ धार्मिक न राहता सामाजिक व सांस्कृतिक स्वरूपही धारण करतो. नवरात्रात महिलांनी ठरावीक रंगांची वस्त्रे परिधान केल्याने त्यांच्यात समानतेची, एकतेची आणि सुरक्षिततेची भावना अधिक दृढ होते,” असे त्यांनी सांगितले.
यावर्षीचे रंग
१)सोम.२२ सप्टेंबर – सफेद/पांढरा
२) मंगळ.२३ सप्टेंबर – लाल
३) बुध.२४ सप्टेंबर – निळा
४) गुरू.२५ सप्टेंबर – पिवळा
५) शुक्र.२६ सप्टेंबर – हिरवा
६) शनि.२७ सप्टेंबर – करडा/ग्रे
७) रवि. २८ सप्टेंबर – केशरी/भगवा
८) सोम.२९ सप्टेंबर- मोरपिशी/पिकाक ग्रीन
९) मंगळ.३० सप्टेंबर- गुलाबी.
१०) बुध.१ आक्टोबर – जांभळा.

