(चिपळूण)
तालुक्यातील तांबेवाडी (बामणोली) येथे शुक्रवारी दुपारी झालेल्या भीषण घटनेत ४८ वर्षीय तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू झाला. दुपारी साधारण १२.३० च्या सुमारास ही घटना घडली असून ऐन गणेशोत्सवाच्या काळात या दुर्घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत तरुणाची ओळख सुधाकर परशुराम तांबिटकर (वय ४८, रा. बामणोली, चिपळूण) अशी झाली आहे. घटनेनंतर ग्रामस्थांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली; मात्र त्यावेळीपर्यंत त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
या बाबत चिपळूण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

