(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण 54 हजार हेक्टर इतके क्षेत्र खरीप व रब्बी पिकाखाली आहे. 1 लाख 88हजार इतके क्षेत्र फळपिकाखाली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी कृषी, आत्मा विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत आहेत.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना – सन २०२४-२५ मध्ये या योजनेअंतर्गत एकूण १३६० हे. क्षेत्रावर विविध फळपिकांची लागवड करण्यात आली आहे. तसेच सन २०२५- २०२६ मध्ये आजपर्यंत एकूण ११३२.३० हे. इतक्या क्षेत्रावर फळबाग लागवड पूर्ण झालेली आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना – पी एम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण २० हप्त्यांचे वितरण शासनाकडून झाले असून जिल्ह्यात शेतकऱ्यांना ७०४.७९ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. तसेच २ ऑगस्ट रोजी २० वा हफ्ता वितरणाद्वारे जिल्ह्यातील १,६१,३९४ शेतकऱ्यांना ३४.७८ कोटी निधी वितरित करण्यात आला.
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना – या योजनेअंतर्गत एक लाख ६० हजार शेतकऱ्यांना सहा हप्त्यांमध्ये रक्कम रुपये १८८.२३ कोटी निधी शासनाकडून लाभार्थ्यांच्या खाती जमा करण्यात आले आहेत.
हवामान आधारीत फळपीक विमा योजना – आंबिया बहार २०२३-२०२४ करिता आंबा व काजू पिकाकरिता फळ पीक विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांना ७९.१८ कोटी नुकसान भरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या खाती जमा करण्यात आलेली आहे. तसेच सन २०२४-२०२५ करिता ३६४६८ शेतकऱ्यांनी १८०२५ हे. क्षेत्राकरिता आपल्या आंबा व काजू फळपिकाकरिता फळ पीक विमा उतरविला आहे.
खरीप पीक विमा – २०२४-२०२५ या योजनेत ९८८ शेतकऱ्यांना ६८.६१ लक्ष नुकसान भरपाई मंजूर झाली आहे.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना – जिल्ह्यात सन २०२४ २०२५ मध्ये १२३ शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजूर करुन रक्कम रु. २४५ लक्ष अनुदान त्यांच्या खाती जमा करण्यात आले आहेत.
नैसर्गिक आपत्ती – अंतर्गत सन २०२४-२५ मध्ये ५८२.२७ हे क्षेत्रासाठी ४४८८ शेतक-यांना ११९.०४ लक्ष नुकसान भरपाई रक्कम अदा करण्यात आली आहे. या वर्षी या योजनेअंतर्गत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान कार्यक्रम- महाडिबीटीद्वारे रक्कम रु. २४ लाख संबंधित शेतक-यांच्या खाती जमा करण्यात आलेली आहे.
ठिबक व तुषार सिंचन योजना – सन २०२५-२६ मध्ये १२५ शेतकऱ्यांची निवड झाली आहे. *कृषी यांत्रिकीकरण योजना -* यावर्षी या योजनेत २१३ शेतक-यांना रक्कम रु. ४५.४६ लक्ष अनुदान वितरीत करण्यात आलेले आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन योजना – जिल्ह्यात या योजनेत ११० सेंद्रिय उत्पादक गटांची स्थापना करुन ११ शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापित होणार आहेत. तसेच नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत ५२ गटांची स्थापना करण्यात आली.
प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग योजना – जिल्ह्यात आजपर्यंत ३९३ प्रक्रिया उद्योगांना रुपये १४४३.१२ लाख अनुदान वितरीत करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग योजना – जिल्ह्यात ३० महिला स्वयं सहाय्यता गट व शेतकरी गट यांना रुपये ७५.४० लाख अनुदान वितरीत करण्यात आले आहे. व सिंधुरत्न समृद्ध योजने अंतर्गत ८.१२ लाख अनुदान वितरीत करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग योजना – जिल्ह्यात सामाईक पायाभूत सुविधा अंतर्गत ०५ शेतकरी उत्पादक कंपनी व संस्था यांना २६२.१३ लाख अनुदान वाटप करण्यात आले आहे व सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत ११८.७५ लाख अनुदान वितरीत करण्यात आले आहे.
मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प – १४ प्रकल्पांना मान्यता देण्यात आली असून ६ शेतकरी उत्पादक कंपनी शेतकऱ्यांचे प्रकल्प रक्कम १३९५.६८ लाख असून त्यांना प्रकल्प उभारण्याकरिता २४३.२७ लाखाचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री कृषी व अन्नप्रक्रीया योजना – जिल्ह्यात ०४ प्रकल्पांना ६९.२५ लाख अनुदान रक्कम वितरीत करण्यात आली असून २ प्रकल्प प्रस्ताव प्रगतीपथावर आहेत.
जिल्हा नियोजन निधी – सन २०२५-२६ नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्याच्या शेतक-यांना भात व नाचणी बियाणे वितरण प्रात्यक्षीक योजनेअंतर्गत ४४ लाख १९ हजार रकमेचे भात बियाणे वितरण ६६०६६ किलो. लाभधारक शेतकरी ३५००, नाचणी बियाणे वितरण ४३५२ किलो, लाभधारक शेतकरी २००० आहेत व आदिवासी शेतकरी बांधवांना तूर बियाणे वितरण ५०० किलो, लाभधारक शेतकरी ५०० आहेत.
– प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते
जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी

