(संगमेश्वर / मकरंद सुर्वे)
संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथील माखजन इंग्लिश स्कूल व ॲड. पी. आर. नामजोशी कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तसेच माखजन इंग्लिश मिडीयम स्कूल, सरंद येथील विद्यार्थ्यांनी डेरवण येथे झालेल्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे.
रत्नागिरी जिल्हास्तरीय सॉफ्ट टेनिस (मुली) स्पर्धेत १९ वर्षाखालील गटात तन्वी पकडे हिने प्रथम, अदिती साळवी हिने तृतीय, सानिका कुळे हिने चौथा व श्रेया फणसे हिने पाचवा क्रमांक पटकावला. तर १७ वर्षाखालील गटात समृद्धी मोबारकर हिने द्वितीय, जान्हवी गोताड हिने तृतीय आणि बुशरा कापडी हिने प्रथम क्रमांक मिळवला.
या यशस्वी खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, त्यांना क्रीडा शिक्षक क्रांती म्हैसकर, निखिल वारके, प्रा. अभिजित सुर्वे व सचिन कदम यांनी मार्गदर्शन केले.
यशस्वी विद्यार्थी व त्यांच्या मार्गदर्शकांचे संस्था अध्यक्ष किशोर साठे, उपाध्यक्ष शशिकांत घाणेकर, सचिव दीपक पोंक्षे, शाळा समिती अध्यक्ष मनोज शिंदे, सहसचिव दीपक शिगवण, सुभाष सहस्त्रबुद्धे, मुख्याध्यापक महादेव परब, पर्यवेक्षक अंबादास घाडगे, इंग्लिश मिडीयमच्या मुख्याध्यापिका श्रीमती धनश्री राजेसावंत भोसले यांच्यासह अन्य संचालक व पालकांनी अभिनंदन केले आहे.

