(तरवळ / अमित जाधव)
रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय शाळा तरवळ नंबर १ ला ग्रुप ग्रामपंचायत तरवळ आगवे यांच्या मार्फत ५ सी.सी.टी.व्ही कॅमेरे देण्यात आले.
सध्या राज्यभर प्रत्येक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी सी.सी.टी.व्ही असणे बंधनकारक आहे. पण काही शाळा एवढा मोठा खर्च निधी अभावी करू शकत नाहीत. त्यामुळे ग्रुप ग्रामपंचायत तरवळ आगवे यांनी शाळेची गरज ओळखून आपल्या अखत्यारीतील निधी उपलब्ध करून या शाळेला हे सी.सी.टी.व्ही कॅमेरे उपलब्ध करून दिले आहेत.
आता ही ग्रामीण भागातील शाळा सी.सी.टी.व्ही च्या निरीक्षणाखाली असणार आहे. सदरचे सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसविण्यासाठी गावातील सुरेश वायरमन यांनी कोणताही मोबदला न घेता लाऊन दिले आहेत. ग्रुप ग्रामपंचायत तरवळ आगवे यांनी सरपंच रमेश मालप आणि त्यांच्या सर्व संचालक मंडळ यांच्या मार्फत दिलेले सी.सी.टी.व्ही कॅमेरे आणि ते बसविण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले ते सुरेश वायरमन यांचे केंद्रीय शाळा तरवळ नंबर १ चे मुख्याध्यापक मोघे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजन कुळ्ये तसेच सर्व शिक्षक, ग्रामस्थआणि पालक वर्ग यांनी धन्यवाद दिले आहेत.

