(मुंबई / निलेश कोकमकर)
कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई संलग्न कुणबी युवा मंडळ यांची सन २०२४ ते २०२९ या कालावधीसाठी नूतन कार्यकारिणी आणि पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच परळ येथील कुणबी ज्ञाती गृह (वाघे हॉल) येथे संघ अध्यक्ष अनिल नवगणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
सभेच्या प्रारंभी सरचिटणीस कृष्णा वणे यांनी उपस्थितांचे स्वागत करून संघाची पार्श्वभूमी, ध्येय-धोरणे, इतिहास आणि कामकाजाची माहिती दिली. १०५ वर्षांची परंपरा लाभलेल्या या मातृसंस्थेच्या युवा मंडळाच्या नव्या कार्यकारिणीसाठी निवड प्रक्रिया उत्साहात पार पडली.
कार्यकारिणी निवडीदरम्यान आठ जिल्ह्यांतील प्रतिनिधींमध्ये उत्साहाचे वातावरण होते. अध्यक्षपदापासून सहसचिवपदापर्यंत अनेक पदांसाठी स्पर्धा पाहायला मिळाली, मात्र सर्वांची एकवाक्यता आणि संघाच्या नियमांची अंमलबजावणी करत, निवड प्रक्रिया बिनविरोध आणि खेळीमेळीच्या वातावरणात पूर्ण झाली.
नूतन कार्यकारिणीत एकूण ५१ सदस्य असून त्यापैकी ११ जणांची पदाधिकाऱ्यांपदी निवड करण्यात आली. निवड झालेली नावे पुढीलप्रमाणे:
अध्यक्ष – युवराज (संतोष) कांबळे (गुहागर)
उपाध्यक्ष – मिलिंद चिबडे (महाड-पोलादपूर), प्रतिक मिसाळ (खेड), अॅड. महेश आंबवले (तळा), पुनित खांडेकर (ठाणे शहर)
सरचिटणीस – सचिन रामाणे (संगमेश्वर)
सहचिटणीस – पंकज पालकर (माणगाव), नितिन भुवड (मुरुड-जंजिरा), अविनाश आग्रे (लांजा), बारकू बेडल (चिपळूण)
खजिनदार – पांडुरंग दोडेकर (रोहा)
या निवडीच्या वेळी संघाचे उपाध्यक्ष शंकरराव म्हसकर, बबन उंडरे, उदय कठे, अॅड. अवधूत तोरस्कर, सहसचिव माधव कांबळे, प्रमोद खेराडे, रवींद्र कुडतडकर, संजय उमासरे, खजिनदार महेश शिर्के, सदस्य चंद्रकांत कोकमकर तसेच महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. दीपिका आग्रे, सहसचिव सौ. स्मिता गोंधळे आणि खजिनदार कु. मीनाक्षी लोडे उपस्थित होते.
कुणबी युवा मंडळाने यापूर्वी अनेक सामाजिक, शैक्षणिक, रोजगाराभिमुख व सांस्कृतिक उपक्रम राबवले आहेत. नव्या कार्यकालात सामाजिक प्रश्नांवर जनजागृती, शेतकऱ्यांचे प्रश्न, ओबीसी हक्क चळवळ आणि युवकांचे राजकीय सक्षमीकरण या मुद्द्यांवर अधिक भर देण्याचे ठरवण्यात आले आहे. शेवटी, संघाचे सरचिटणीस कृष्णा वणे यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचे आभार मानत सभेचा समारोप केला.