(खेड)
उबाठाचे खेड तालुकाप्रमुख संदीप कांबळे यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.
या वेळी शाखाप्रमुख वैभव खानविलकर, संजय खानविलकर, विनायक खानविलकर, सोहम खानविलकर, यश खानविलकर आणि शुभम खानविलकर यांच्यासह संदीप कांबळे यांचे अनेक सहकारीही शिवसेनेत सामील झाले.
हा पक्षप्रवेश स्थानिक राजकारणात महत्त्वपूर्ण मानला जात असून, शिवसेनेची खेड तालुक्यातील संघटनात्मक ताकद यामुळे अधिक मजबूत होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.