(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा (मराठी माध्यम) येथे नवागत विद्यार्थ्यांचे औपचारिक स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले. पहिलीत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी खास स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विद्यार्थ्यांची मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात रंगतदार वातावरणात पार पडली. या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या जि.प. कार्यकारी अभियंता सौ. मयुरी पाटील यांच्या हस्ते पारंपरिक औक्षण करून नवागतांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमास केंद्रप्रमुख श्री. अमर घाटगे, मुख्याध्यापिका सौ. रजनी मोहीते, शिक्षिका सौ. कोमल गोरे, सौ. नीलिमा इंदुलकर, सौ. स्नेहल धामापुरकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. श्रुती भरणकर, ग्रामपंचायत सदस्या सौ. सनगरे, ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, बूट, सॉक्स आणि पाठ्यपुस्तकांचे वाटपही करण्यात आले. हे वितरण जि.प. कार्यकारी अभियंता सौ. मयुरी पाटील यांच्या हस्ते, तसेच केंद्रप्रमुख श्री. अमर घाटगे आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. श्रुती भरणकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
फोटो १: जि.प. केंद्र शाळा मराठी शिरगाव येथे विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व पाठ्यपुस्तक वाटप करताना जि.प. कार्यकारी अभियंता सौ. मयुरी पाटील. सोबत केंद्रप्रमुख श्री. अमर घाटगे.
फोटो २: नवागतांचे स्वागत करताना केंद्रप्रमुख श्री. अमर घाटगे व मुख्याध्यापिका सौ. रजनी मोहीते.
(छायाचित्र – दिनेश पेटकर, गावखडी)