(राजापूर / तुषार पाचलकर)
रत्नागिरी जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी संघटना (DNE 136) शाखा – राजापूर यांची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक १३ जून २०२५ रोजी कोतापूर (ता. राजापूर) येथे उत्साहात पार पडली. यावेळी राजापूर तालुक्याच्या नूतन कार्यकारिणीची निवडणूक पार पडली. दर पाच वर्षांनी होणाऱ्या या निवडणुकीत यंदा अध्यक्षपदी पाचल गावचे श्री. संतोष चव्हाण यांची तसेच अन्य पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडीबद्दल संतोष चव्हाण आणि नव्याने नियुक्त झालेल्या कार्यकारिणीवर राजापूर तालुक्यातून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:
अध्यक्ष – संतोष चव्हाण
उपाध्यक्ष – प्रशांत कांबळी
महिला उपाध्यक्ष – सौ. निधी जोशी
सचिव – निशांत रायकर
सहसचिव – प्रशांत डिगुळे
कोषाध्यक्ष – प्रदीप जाधव
सभासद – राजेंद्रप्रसाद राऊत, अभिजित कोरे, मंगेश जाधव, विलास सोबण, पंकज कुबल, गोरक्ष शेलार, शैलेश हलम, शेखर कावतकर, सौ. सोनम साळवी, सौ. शिल्पा मयेकर, हनिफ नाईक
सल्लागार – संदीप हांदे, अनिल पिठलेकर
संघटनेच्या पुढील कार्यकाळात नव्याने निवडून आलेल्या कार्यकारिणीकडून अधिक प्रभावी व गतिमान कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.