(संगमेश्वर / दिनेश अंब्रे)
कसबा शास्त्रीपूल पारकरवाडा येथील ज्येष्ठ पत्रकार श्री. बहाब दळवी यांचे पुतणे आणि श्री. असलम दळवी यांचे सुपुत्र कु. आसीम असलम दळवी यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण करत डॉक्टर होण्याचा मान मिळविला. त्यांच्या या उल्लेखनीय यशाचा गौरव म्हणून हन्नफी जमात, दखनी मोहल्ला मुस्लिम समाज हन्नफी जमात आणि दळवी मांचे शास्त्रीपूल येथील निवासस्थानी आयोजित विशेष सत्कार समारंभात त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा. राजाराम चव्हाण व हन्नफी जमातीचे अध्यक्ष अल्लीखान नाना यांच्या हस्ते आसीम यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास हन्नफी जमातीचे ज्येष्ठ सदस्य श्री. अशरफ शहा, सिराज दळवी, कादर दळवी, इलियास मापारी, शाफई जमातीचे माजी अध्यक्ष हनिफ खलफे, मौअज्जम पिरखान, रियाज नगारजी, संगमेश्वर मापारी मोहल्ला जमातीचे अध्यक्ष रऊफ खान, अल्ताफ कापडी, असलम दळवी, मन्सूर खान, कु. उमेर दळवी, नाईफ दळवी, सौ. नसीरा रांगणेकर, सौ. अल्फिया दळवी, हरून दळवी, मौज दळवी, पोलीस अधिकारी जोशी, ज्येष्ठ पत्रकार मुजीब खान, नियाज खान, दीपक तुळसणकर, मिलिंद कडवईकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन ज्येष्ठ पत्रकार श्री. बहाब दळवी यांनी केले.