( शिर्डी )
शिर्डी साईबाबा संस्थानच्या दान मोजणी कक्षात चोरी करणाऱ्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. बाळासाहेब नारायण गोंदकर या लेखा विभागातील शिपायाने तीनवेळा पैसे चोरले आणि दोनवेळा चोरीचा प्रयत्न केला होता. तो मोजणीदरम्यान नोटांचे बंडल लपवून दुसऱ्या दिवशी बाहेर काढायचा. साई संस्थानने सीसीटीव्ही फुटेज तपासून 29 मे रोजी पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानंतर शुक्रवारी गोंदकरला अटक करण्यात आली. संस्थानकडून त्याला निलंबित करण्यात आलं आहे.
पोलिस तपासात आता त्याने चोरलेली रक्कम, आणि या कारवायांमध्ये अन्य कोणी सहभागी होतं का, हे शोधलं जात आहे. संस्थान केवळ 15 दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज ठेवत असल्याने याआधीही गोंदकरने चोरी केली होती का, हे शोधणं गरजेचं ठरत आहे. गोंदकरची कस्टडी मिळाल्यानंतर त्यानं चोरलेली रक्कम आणि या चोरीत त्याचे इतर कोणी साथीदार होते का? हेही समोर येणार आहे. साई संस्थानकडं केवळ पंधरा दिवसाचंच सीसीटीव्ही फुटेज जतन करुन ठेवलेलं असतं. त्यामुळे या आधीही अशा चोऱ्या बाळासाहेब गोंदकर आणि इतरांनीही केल्या होत्या का? हे सगळं आता पोलिसांच्या तपासातून समोर आणणं गरजेचं आहे. या प्रकाराचा सखोल शोध घेऊन कठोर कारवाईची मागणी भाविकांमधून होत आहे.