(मुंबई)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या (SSC) परीक्षेचा निकाल १३ मे २०२५ रोजी जाहीर करण्यात आला होता. या परीक्षेस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका आता Digilocker प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मंडळाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेस (इयत्ता १० वी) बसलेल्या आणि यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना APPAR-ID द्वारे Digilocker मध्ये गुणपत्रिका प्राप्त करता येणार आहे.
📲 APPAR-ID असणाऱ्यांना थेट लाभ
ज्यांच्या APPAR-ID ची नोंद शिक्षण मंडळाकडे अचूक करण्यात आली आहे, अशा विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका थेट त्यांच्या Digilocker अकाउंटमध्ये लिंक करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना APPAR-ID वापरून थेट गुणपत्रिका पाहता येणार आहे.
📌 APPAR-ID नसलेल्यांसाठी पर्याय
ज्या विद्यार्थ्यांचे APPAR-ID उपलब्ध नाही, अथवा मंडळाकडे नोंदवले गेलेले नाहीत, त्यांनी परीक्षेचे वर्ष व बैठक क्रमांक (Seat Number) वापरून Digilocker अॅप किंवा वेबसाइटवरून आपली गुणपत्रिका डाऊनलोड करता येईल.
🏫 मुख्याध्यापक, विद्यार्थी आणि पालकांसाठी सूचना
या प्रक्रियेविषयी सर्व संबंधित मुख्याध्यापक, विद्यार्थी व पालक यांनी आवश्यक ती नोंद घ्यावी, असे आवाहन मंडळाने केले आहे. Digilocker वापरण्याच्या सूचना शाळांमार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारीही शाळा प्रशासनावर सोपवण्यात आली आहे.
🔗 Digilocker मध्ये गुणपत्रिका कशी मिळवायची?
- Digilocker अॅप किंवा https://www.digilocker.gov.in या संकेतस्थळावर लॉग इन करा.
- ‘Education’ विभागात जाऊन Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education निवडा.
- त्यानंतर APPAR-ID किंवा Seat Number टाका.
- गुणपत्रिका स्क्रीनवर दिसेल; ती डाउनलोड व सेव्ह करू शकता.