(संगमेश्वर)
नैसर्गिक आपत्तींचा संभाव्य धोका लक्षात घेऊन दि. 27 मे 2025 रोजी सकाळी 11 ते सायं. 6.30 वाजेपर्यंत आंबाघाट ते करंजारी-चोरवणे या महामार्गावरील रस्त्याची सविस्तर पाहणी ठेकेदार रवी इन्फ्रा कंपनीच्या अधिकाऱ्यांसह तालुका प्रशासनाकडून करण्यात आली.
या पाहणी दौऱ्यात प्रभारी प्रांताधिकारी मा. विश्वजीत गाताडे, तहसिलदार श्रीमती अमृता साबळे, नायब तहसिलदार श्री. गोताड, श्री. अनिल सुरेश सिंह पाटील, नॅशनल हायवेचे अधिकारी श्री. कुलदीप कुमार दिक्षीत, तसेच रवि इन्फ्रा हायवे कंपनीचे इंचार्ज अधिकारी उपस्थित होते.
प्रथम कोंडगाव तिठा ते आंबाघाट, व त्यानंतर आंबाघाट ते चोरवणे दरम्यान रस्त्याची पाहणी करण्यात आली. या दरम्यान रस्त्यालगत असलेला चिखल, खड्डे, दरड कोसळण्याची शक्यता असलेली ठिकाणे व अन्य धोकादायक भाग याची बारकाईने तपासणी झाली. पाहणीदरम्यान हायवे अधिकाऱ्यांना विविध सुचना करण्यात आल्या. यामध्ये स्त्याची तातडीने दुरुस्ती, आवश्यक ठिकाणी रिफ्लेक्टर बसवणे, दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या भागात JCB व फोकलेन्ड यंत्रणा सज्ज ठेवणे, या महत्त्वाच्या उपाययोजना सुचविण्यात आल्या. हायवे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुचनांनुसार तात्काळ योग्य त्या उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगितले.