(राजापूर / विनोद चव्हाण)
मुचकुंदी नदीवरील लांजा व राजापूर या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित “स्वप्नपूर्ती गोळवशी – वडदहसोळ” पूलाचा लोकार्पण सोहळा शनिवार, दि. १७ मे २०२५ रोजी जल्लोषात पार पडला. मुचकुंदी परिसर विकास संघ (MPVS) लांजा-राजापूर या सामाजिक संस्थेच्या आठव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून पार पडलेल्या या सोहळ्याने ग्रामस्थांचे दीर्घकाळाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले.
ढोल-ताशांच्या गजरात झालेल्या या मंगलमय सोहळ्याला विविध गावांतील सरपंच, प्रतिष्ठित मान्यवर, महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष सुभाष तांबे यांच्या नेतृत्वाखालील नियोजनाने आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने या पूलप्रकल्पाचे स्वप्न आज सत्यात उतरले.
वर्धापन दिन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यमान आमदार यांच्यासह विद्यमान खासदार तत्कालीन आमदार-खासदार, जिल्ह्याचे मंत्री महोदय यांना आमंत्रित करण्यात आले होते. परंतु आमदार श्री. किरण सामंत यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांच्या अनुमतीने संस्थेच्या नियोजनानुसार लक्ष्यवेधी गोळवशी-वडदहसोळ पूलाचा लोकार्पण सोहळा गावकरी आणि विविध गावातील मान्यवर व्यक्तीच्या शुभहस्ते करून जनतेसाठी खुला करण्यात आला.
वडदहसोळ गावचे गावप्रमुख श्री. ऊमाजी तुळाजी पळसमकर यांचे सुपुत्र अशोक पळसमकर, श्री. गंगाराम म्हादये, श्री. भानू गितये, श्री. नारायण म्हादये, वडदहसोळ सरपंच श्री. विजय घाडये, श्री. नारायण म्हादये, रूण सरपंच सुहास साखरकर, निवोशी-इंदवटी सरपंच श्री. विनोद गुरव, चुनाकोळवण सरपंच श्री. श्रीकांत मटकर, रावारी-बापेरे सरपंच श्री. गजानन तानू बाणे, कोंडये सरपंच श्री. मनोज चंदूरकर, माजी अध्यक्ष श्री. विजयदादा भगते, उपाध्यक्ष, ग्रामीण विभाग प्रमुख तथा उपाध्यक्ष गणेश खानविलकर, सल्लागार श्री. रविंद्र मटकर, सल्लागार तथा पाठपुरावा विभाग प्रमुख श्री.अमोल पळसमकर, वडदहसोळ हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. बावधनकर सर, जिजाऊ सामाजिक संघटना लांजा तालुका अध्यक्ष योगेश पांचाळ, वक्ते वैभव म्हसणे आदि व्यासपीठावर उपस्थितीत मान्यवर म्हणून लाभले. महिलांसाठी ‘सौभाग्याचं लेणं’ या संकल्पनेत हळदीकुंकू समारंभाने सोहळ्याला खास सांस्कृतिक परिमाण दिले.
संस्थेच्या माध्यमातून गेल्या आठ वर्षांत विविध लोकोपयोगी उपक्रम राबवले गेले असून, हा पूल प्रकल्प त्यातील सर्वात मोठी उपलब्धी ठरली आहे. पूलासाठी सातत्याने शासकीय पाठपुरावा करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या निष्ठा आणि मेहनतीची ही फलश्रुती असल्याचे सर्व मान्यवरांनी आपल्या भाषणांतून नमूद केले.
एमपीव्हीएस संस्था मागील आठ वर्षे सातत्याने ग्रामीण स्तरावर विविध लोकोपयोगी उपक्रम राबवून जनतेत ऋणानुबंध जपण्याचे कार्य करीत आहे. लोकभावनेतून लोकार्पणास आलेल्या पूलाचा शासकीय -प्रशासकीय यंत्रणेसोबत पाठपुरावा करून पूल मार्गी लावण्यासाठी अनेकांनी अहोरात्र आणि निष्ठापूर्वक तन-मन-धन विश्वासार्ह योगदान दिले. त्या सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. वर्धापन दिन सोहळ्याच्या अनुषंगाने विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्यांचे मागील वर्षात उल्लेखनीय आणि प्रशंसनीय कामगिरी ठरली अशांना शिलेदार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
शिलेदार पुरस्कारासाठी श्री. विनीत म्हादये, बलराम तांबे, सुजय गितये, संदीप कांबळे, अमर गोरूले, शैलेश गुरव तर विशेष कामगिरी सहकार्य करिता श्री. मनोहर भेरे, तुकाराम म्हादये, श्री. आनंद बावधनकर, गुलशन मुकादम, प्रकाश स. पळसमकर, संदीप जोगळे, सुनिल कांबळी, किरण भालेकर, अजय भगते, युवराज गितये, दशरथ तांबे, अविनाश तांबे, विकास पळसमकर, भगवान तळेकर, सुनिल मटकर, संदीप सी म्हादये, विश्वनाथ जोगळे, सुहास साखरकर, रवी गितये, सुरेश गितये, महेश मांडवकर, राजेंद्र पालये, विनोद चव्हाण, प्रशांत जोगळे, नित्यानंद घाडीगावकर, सुनिल मिरजोळकर, ऐश्वर्या घाडये, संचिता खानविलकर, प्रकृती कांबळे, सलोनी कांबळे, सुजाता हातणकर-तांबे, ललिता तरल-आग्रे, मानसी गितये आदीना विशेष कामगिरी म्हणून सन्मानित करण्यात आले. तसेच शिलेदार पुरस्कार देऊन अनेक कार्यकर्त्यांना गौरविण्यात आले. तर यंदाचा “MPVS भूषण पुरस्कार” अजय मांडवकर यांना प्रदान करण्यात आला. संस्थेचे उद्देश वैभव भगते यांनी प्रास्ताविकातून मांडले, तर सूत्रसंचालन अजय मांडवकर यांनी केले.
शुभाष तांबे यांनी अध्यक्षीय भाषणात पूलप्रकल्पाची वाटचाल, अडचणी आणि यशोगाथा कथन करताना, पुढील आरोग्य प्रकल्पाबाबतची दृष्टीही मांडण्यात आली. हा पूल म्हणजे केवळ स्वप्नपूर्ती नव्हे, तर लांजा-राजापूरच्या विकासाचा नवीन अध्याय असल्याचे संस्थेने ठामपणे सांगितले.