(नवी दिल्ली)
टाटा ब्रँडची ताकद किती व्यापक आहे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे आता त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश देशातील सर्वोच्च संवैधानिक कार्यालय – राष्ट्रपती भवनात झाला आहे. नुकतेच TATA.ev ने आपल्या इलेक्ट्रिक कार्स राष्ट्रपती भवनात सुपूर्द केल्या आहेत.
राष्ट्रपती भवनात टाटा कर्व्ह आणि टियागो ईव्ही
टाटा समूहाने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही माहिती दिली. त्यांनी टाटा कर्व्ह ईव्ही आणि टाटा टियागो ईव्ही या गाड्यांची राष्ट्रपती भवनात डिलिव्हरी केली आहे. राष्ट्रपती भवन हे देशाच्या राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान आणि सचिवालय आहे. शक्ती आणि सत्तेचे प्रतीक मानला जाणारा काळा रंग असलेल्या ‘डार्क एडिशन’ गाड्याही राष्ट्रपती भवनात पोहोचवण्यात आल्या आहेत. टाटा कर्व्ह ही एक प्रीमियम इलेक्ट्रिक SUV असून टाटा टियागो ही परवडणारी हॅचबॅक आहे.
टाटा कर्व्ह ईव्ही – शक्तिशाली आणि स्टायलिश
-
एक्स-शोरूम किंमत: ₹२२.२४ लाख
-
बॅटरी पॅक: ५५ kWh
-
रेंज: ५०२ किमी (एकाच चार्जमध्ये)
-
पॉवर: १६५ bhp
-
टॉर्क: २१५ Nm
टाटा टियागो ईव्ही – परवडणारी आणि प्रभावी
-
प्रारंभिक किंमत: ₹७.९९ लाख (एक्स-शोरूम)
-
बॅटरी पॅक: १९.२ kWh (साधी आवृत्ती), २४ kWh (लांब पल्ल्याची आवृत्ती)
-
रेंज: ३१५ किमी (दावा केलेली)
-
पॉवर: ६०.३४ bhp (साधी), ७३.७५ bhp (लांब पल्ला)
-
टॉर्क: ११० Nm / ११४ Nm
टाटा मोटर्स – भारतातील अग्रगण्य EV ब्रँड
आज टाटा मोटर्स ही भारतातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी आहे. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये पंच, टिगोर, नेक्सन यांसारख्या लोकप्रिय इलेक्ट्रिक कार्स आहेत. सुरक्षिततेच्या बाबतीतही टाटाच्या गाड्यांना आज देशात तोड नाही, आणि म्हणूनच ग्राहकांचा टाटावर अधिकाधिक विश्वास बसतो आहे.