भारतात सर्वात पहिली लाँच झालेली एसयूव्ही कोणती? तिचं नाव आहे “टाटा सियारा” भारतीय ऑटोमोबाईल इतिहासात SUV संकल्पना आणण्याचं श्रेय टाटा मोटर्सला जातं. १९९१ साली, म्हणजे तब्बल ३४ वर्षांपूर्वी, सियारा भारतीय रस्त्यांवर दाखल झाली आणि देशातील पहिल्या SUV म्हणून इतिहासात आपलं नाव कायमचं कोरून गेली.
१९९१: भारतीयांसाठी SUV ही पूर्णत: नवी संकल्पना
त्या काळात भारतीय बाजारावर सेडान आणि हॅचबॅक कारचं वर्चस्व होतं. SUV ही संकल्पना देशात जवळजवळ अस्तित्वातच नव्हती. विदेशी जीप उपलब्ध होत्या, पण त्या बहुतेक विशिष्ट गरजांसाठी किंवा मर्यादित वर्गासाठी होत्या. याच काळात टाटा मोटर्सने ३-डोअर, बॉक्सी डिझाइन, मजबूत बांधणी आणि दमदार इंजिनासह सियारा सादर केली. ही SUV एवढी वेगळी आणि आधुनिक होती की भारतीय ग्राहकांसाठी ती एक फ्यूचरिस्टिक गाडी मानली जात होती.
लाँच किंमत – तेव्हा लक्झरी, आज अविश्वसनीय!
१९९१ मध्ये टाटा सियाराची किंमत ५ लाख रुपये होती. त्या वेळी मारुती ८०० सारख्या लोकप्रिय कार १ ते १.५ लाखांमध्ये मिळत. या तुलनेत सियारा अत्यंत प्रीमियम सेगमेंटमध्ये मोडत होती. एक सामान्य भारतीय कुटुंबासाठी ही कार म्हणजे अत्यंत महागडा पर्याय, पण लक्झरी गाड्यांइतकी स्टाईल आणि ताकद देणारी पहिली भारतीय SUV म्हणून सियाराची चर्चा देशभरात झाली.
टाटा सियारा: त्या काळातील प्रगत फीचर्स
सियारा ही त्या काळातील कोणतीही भारतीय गाडीपेक्षा खूपच पुढे होती. त्यातील काही वैशिष्ट्ये:
- पॉवर विंडोज – त्या काळची दुर्मिळ सुविधा
- अॅडजस्टेबल स्टीअरिंग
- फॅक्टरी-फिटेड एसी
- अनोखी अल्पाइन विंडो (मोठी मागील काच)
- ३-डोअर SUV डिझाइन – भारतीय मार्केटमध्ये अगदी नवं
- बॉडी-ऑन-फ्रेम – जबरदस्त मजबूती
- 4×4 पर्याय – ऑफ-रोडिंगसाठी योग्य
अशा प्रीमियम सुविधांमुळे सियारा ९० च्या दशकातील “स्टाइल, दमदारपणा आणि रुबाब” या सर्वांचं प्रतीक बनली.
इंजिन आणि परफॉर्मन्स
लाँचवेळी सियारामध्ये २.०-लिटर डिझेल इंजिन देण्यात आलं होतं.
नंतर १९९७ ला टर्बोचार्ज्ड २.०-लिटर इंजिन (८७ बीएचपी) सादर केलं, ज्यामुळे तिचा परफॉर्मन्स आणखी उंचावला. ही कार फक्त शहरात नव्हे तर डोंगराळ भागातही उत्कृष्ट कामगिरी करत होती.
२०२५: द लेजेंड इज बॅक! – टाटा सियारा नवी आवृत्ती लाँच
दीर्घ प्रतीक्षेनंतर टाटा मोटर्सने २५ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबईत भव्य लाँच कार्यक्रमात नवी Sierra सादर केली. ही SUV आधुनिक डिझाइन, प्रगत तंत्रज्ञान आणि प्रीमियम फीचर्ससह पुन्हा रस्त्यांवर दाखल झाली आहे.
इन्ट्रोडक्टरी किंमत
₹11.49 लाख (एक्स-शोरूम) ही फक्त सुरुवातीची किंमत असून नंतर वाढण्याची शक्यता आहे.
- बुकिंग – १६ डिसेंबरपासून
- डिलिव्हरी – १५ जानेवारी २०२६पासून
इंजिन पर्याय – एकूण ६ पॉवरट्रेन
नवी सियारा ही ३ इंजिन प्रकारांसह येते:
- पेट्रोल (२ पर्याय)
- डिझेल (१ पर्याय)
एकूण ६ पॉवरट्रेन कॉन्फिगरेशन उपलब्ध.
नव्या Sierra ची डिझाइन हायलाइट्स
- दमदार आणि उंच SUV स्टान्स
- फुल-विड्थ LED DRL
- क्लोज्ड फ्रंट ग्रिलवर टाटा लोगो
- बॉक्सी डिझाइन – जुन्या सियाराची आठवण
- रिअर ‘एंड-टू-एंड’ LED टेललॅम्प्स
- SIERRA बॅजिंग
- सिग्नेचर मोठं ग्लास पॅनल
इंटिरिअर आणि फीचर्स
- ३ स्क्रीन सेटअप:
- १०.२५-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले
- १२.३-इंच सेंट्रल टचस्क्रीन
- १२.३-इंच पॅसेंजर स्क्रीन (वायरलेस हेडफोनसह)
ऑडिओ सिस्टम
- १२- स्पीकर JBL सिस्टम
- डॅशबोर्ड-माउंटेड साउंड बार
- Dolby Atmos सपोर्ट
कम्फर्ट फीचर्स
- डुअल-झोन AC
- व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स
- वायरलेस चार्जिंग
- पावर्ड ड्रायव्हर सीट
- वायरलेस Apple CarPlay / Android Auto
- ३१६ मिमी गँगवे स्पेस
- ६२२ लिटर बूट स्पेस
सुरक्षा फीचर्स
- ६ एअरबॅग्स
- ISOFIX सीट अँकर्स
- ३६०° कॅमेरा
- फ्रंट पार्किंग सेंसर
- इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक
- चारही चाकांवर डिस्क ब्रेक्स
- ABS + EBD
- हिल-होल्ड
- लेव्हल 2+ ADAS – २२ फीचर्ससह
• भारत NCAP मध्ये ५-स्टार मिळण्याची दाट शक्यता.
टाटा सियारा ही फक्त एक SUV नाही, तर भारतीय ऑटोमोबाईल इतिहासातील एक दर्जेदार अध्याय आहे. १९९१ मधील तिची क्रांतिकारी एन्ट्री आणि २०२५ मधील तिचं आधुनिक, भव्य पुनरागमन, दोन्ही काळाच्या पुढचं आहे. टाटा ने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की “लेजेंड्स नेव्हर डाय – ते फक्त नव्या रूपात परत येत असतात.”
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अनेकांनी टाटा वाहन खरेदी करत सध्या कंपनीतर्फे सुरू असलेल्या अनेक ऑफरचा लाभ घेतला आहे. एस.पी. ऑटोहब मध्ये आपल्या जुन्या कारचे सर्वोत्तम इ-व्हॅल्युएशनही करता येणार आहे. अधिक माहितीसाठी टाटा मोटर्सच्या एस.पी. ऑटोहब रत्नागिरी, चिपळूण, कणकवली अथवा ओरोस येथील आपल्या नजीकच्या शोरूम ला भेट द्या किंवा 7377959595 या मोबाईल नंबरवर संपर्क करा, असे आवाहन श्री. अरुण देशपांडे यांनी केले आहे.

