(रत्नागिरी)
तालुक्यातील करबुडे गावात झाड तोडण्याचे काम करत असताना झाडावरून पडून ४६ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत व्यक्तीचे नाव सुभाष गोविंद तारवे (वय ४६, रा. हातखंबा, तारवेवाडी, रत्नागिरी) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १३ मे रोजी सकाळी सुभाष तारवे हे करबुडे येथे झाड तोडण्यासाठी गेले होते. सायंकाळी सुमारे ६.१० वाजता झाडावर काम करत असताना ते अचानक खाली कोसळले. स्थानिकांनी तत्काळ त्यांना रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले, मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या दुर्घटनेमुळे हातखंबा परिसरात शोककळा पसरली असून, ग्रामस्थांनी त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत. रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.

