( खेड )
कोकण रेल्वेमार्गावरील आयनी-जुवळा परिसरात शनिवारी सकाळी सुमारे ११:३० वाजता मंगला एक्स्प्रेसच्या धडकेत एका २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या तरुणाचे नाव सौरभ सुभाष तांबे (रा. अंजनी बौद्धवाडी क्र. २) असे असून, तो घरातून पाण्याची बाटली विकत घेण्यासाठी बाहेर पडला होता. मात्र, त्यानंतर तो परत न आल्याने नातेवाईकांनी शोध घेतला.
दरम्यान, रेल्वे चालकांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाला धावत्या मंगला एक्स्प्रेसने जोरदार धडक दिली. या धडकेत सौरभ तांबे यांचा जागीच मृत्यू झाला. खेड पोलिसांनी याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.